आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरातील मुस्लिम बहुल भागांत विस्थापित हिंदूंचे पुनरवसन करणार भाजप, राम माधव यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीरातील मुस्लिम बहुल भागांमध्ये भाजप विस्थापित हिंदूंचे पुनरवसन करणार आहे. भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी ही माहिती दिली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी या मोहिमेला मंजुरी दिली आहे असेही त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 1989 मध्ये काश्मीरातून हिंदूंच्या विरोधात सशस्त्र हल्ले करण्यात आले होते. यामध्ये 2 ते 3 लाख हिंदूंना काश्मीरातून पलायन करावे लागले होते. त्यांच्या घरात परतणे हा हिंदूंचा मूलभूत अधिकार असून त्याचे सन्मान केले जाईल. त्यांना केवळ काश्मीरात वसवलेच जाणार नाही, तर संरक्षण देखील दिले जाणार आहे.


सरकार किंवा गृहमंत्रालयाचा अद्याप अधिकृत दुजोरा नाही
काश्मीरात सद्यस्थितीला 70 लाख लोक राहतात. त्यापैकी 97 टक्के लोक मुस्लिम आहेत. पाकिस्तानातून होणारी घुसखोरी, अंतर्गत अतिरेकी हालचालींमुळे शांततेसाठी लष्कर आणि निमलष्करी दल तैनात आहेत. गेल्या 3 दशकांमध्ये काश्मीरात 50 हजारहून अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राम माधव यांनी सांगितल्याप्रमाणे, यापूर्वी भाजप आणि पीडीपी युतीच्या सरकारने जम्मू-काश्मीरात हिंदूंसाठी सध्या उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये वेगळी वस्ती स्थापित करून त्यांना स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्यक्षात त्यावर काम झाले नाही. या वस्त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक राजकारणी, मुस्लिम नेते आणि हिंदू प्रतिनिधींचा हवे तेवढे सहकार्य मिळाले नाही. काश्मीरत हिंदूंना पुनरस्थापित करण्यासाठी इमारती आणि वस्त्या निर्माण करण्याबाबत भाजपच्या या घोषणेवर गृहमंत्रालयाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.