आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Trinamool Tussle Continues In Bengal: BJP Victory By EVM Scam; We Open The Campaign Mamta Banerjee

बंगालमध्ये भाजप-तृणमूलमध्ये तणातणी सुरूच : ईव्हीएम घोटाळा करून भाजपचा विजय; आम्ही मोहीम उघडू - ममता बॅनर्जी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तणातणी सुरू आहे. ममतांनी सोमवारी पक्षाचे नवनिर्वाचित खासदार, आमदार, मंत्र्यांसोबत २ तास आढावा बैठक घेतली. या बैठकीत ममतांनी बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी अनेक आंदोलनांची रूपरेषा तयार केली. ममता म्हणाल्या, आम्हाला ईव्हीएम नको, मतपत्रिकेद्वारे मतदान हवे. तृणमूल ईव्हीएमच्या विरोधात देशभर इतर पक्षांच्या सहकार्याने घरोघर मोहीम सुरू करेल. देशात फक्त २% ईव्हीएम प्रमाणित आहेत, तर ९८% प्रमाणित नाहीत. भाजपला ईव्हीएमद्वारे जनादेश मिळाला आहे, हा लोकांचा जनादेश नाही. ममतांनी आरोप केला की, १ लाख ईव्हीएम गायब आहेत. मतदानात जी यंत्रे बदलण्यात आली ती एका विशेष पक्षासाठी प्रोग्राम केलेली होती. त्यामुळेच हा पक्ष २३ जागा जिंकण्याबाबत आश्वस्त होता.

 

ममतांनी जय हिंद-जय बांगलाची घोषणा दिली, जय हिंद वाहिनीही स्थापन
ममता म्हणाल्या की, तृणमूल संपूर्ण राज्यात सांस्कृतिक आंदोलन करेल. त्यासाठी जय हिंद वाहिनी नावाची संस्था स्थापन केली आहे. म. गांधी, आंबेडकर, राजा  राममोहन रॉय, बिरसा मुंडा या सर्वांबद्दल आम्हाला अभिमान आहे. त्याआधी ममतांनी जय श्रीरामऐवजी जय हिंद, जय बांगलाची घोषणा दिली. त्या म्हणाल्या, आम्ही ‘जय सिया राम’ असे म्हणतो, त्यात राम आणि सीता आहे. गांधीजी पतित पावन सीता राम हे भजन म्हणत होते.

 

बंगालमध्ये भाजपला पाहून दीदी अस्वस्थ, त्यांना गेट वेल सून कार्ड देऊ : बाबूल सुप्रियो
सोमवारी आसनसोलचे भाजप खासदार बाबुल सुप्रियो म्हणाले की, ममता बॅनर्जी अनुभवी नेत्या आहेत. पण अलीकडे त्यांची वागणूक आश्चर्यकारकरीत्या बदलली आहे. त्यांनी पदाच्या प्रतिष्ठेनुसार आपली बुद्धी स्थिर ठेवायला हवी. त्यांनी काही दिवस विश्रांती घ्यायला हवी. त्या बंगालमध्ये भाजपच्या उपस्थितीमुळे हादरल्या आहेत. आम्ही आसनसोल मतदारसंघातर्फे दीदींना लवकरच गेट वेल सून कार्ड पाठवू.