आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Will Discuss Only Other Than Seats That Won In 2014 Assembly Polls Says Chandrakant Patil

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांना सोडून इतर जागांवरच चर्चा होणार- चंद्रकांत पाटील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आगामी विधानसभेसाठी युतीच्या जागावाटपातील गुंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतचं 2014 ला जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त जागांबाबत चर्चा होणार असे विधान केले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यमान जागा सोडून इतर जागांबाबतच चर्चा होईल असे सुचक विधान केले होते.
 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीमधील जागा वाटपात एकमेंकांच्या विद्यमान जागांना हात लावायचा नाही, अशी दोन्ही पक्षांची भूमिका असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 
 
पुढे ते म्हणाले, आमचे 122 आमदार, अपक्ष 6 आणि नव्याने आलेले 4 असे 132 आमदार आहेत. त्यामुळे 50-50 च्या फॉर्म्यूल्यात आमच्या वाट्याला 135 आमदार येतात. त्यामुळेच आता आम्हाला फक्त 3 आमदारांबाबत विचार करावा लागेल. असाच विचार शिवसेनेलाही करावा लागणार असल्याचेही ते यावेळी बोलले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप आणि शिवसेना 50-50 चा फॉर्म्यूला कसा साधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.