आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली. यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बदनाम केले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी टीका केली. अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्याचे समजत आहे असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुडगावमध्ये ठेवण्यात आले, त्यांना धमकावण्यात आले, हरियाणात त्यांचं सरकार असल्याने बाहेर पोलीस ठेवले होते. असा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केला. भाजपचे आमदारही आमच्याकडे येऊ शकतात, तसेही भाजपमध्ये असलेले अनेक आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत अस मत त्यांनी यावेळी मांडले.
अजित पवारांना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरल्याचे कळतं आहे, हे खरं असेल तर काय सुरु आहे हे जनता पाहात आहे. विधानसभेत विश्वास दर्शक ठरावावेळी आमचा बहुमताचा आकडा तुमच्यापेक्षा 10 ने जास्त असेल, बहुमत आमच्याकडेच असेल अस म्हणत त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना धीर दिला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.