आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बारामती जिंकून महाराष्ट्रात भाजप गाठेल 45 चा आकडा; अयोध्येत ठरलेल्या जागीच राम मंदिर बांधू : अमित शहा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारामती जिंकून भाजप आगामी लोकसभेत राज्यात ४५ जागा जिंकेल, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येथे व्यक्त केला. शहा यांच्या सुरात सूर मिसळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आमचे लक्ष्य बारामती असल्याचे जाहीर केले. अयोध्येत ठरलेल्या जागीच राम मंदिर होईल, असेही ते म्हणाले. पुणे शहर, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील शक्तिकेंद्रप्रमुख, बूथप्रमुखांच्या बैठकीचे शनिवारी पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या वेळी पदाधिकाऱ्यांना शहा यांनी मार्गदर्शन केले. 

 

या वेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खा. अमर साबळे, पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हाध्यक्ष आमदार बाळासाहेब भेगडे उपस्थित होते. दरम्यान, एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हिराबाग चाैकात काळे झेंडे दाखवत विराेध दर्शवला. 

 

अयोध्येतील राम मंदिर ठरलेल्या जागीच होईल, याचा पुनरुच्चार शहा यांनी केला. या विषयवार शरद पवार आणि काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तर प्रदेशात कोणतीही आघाडी होवो, लोकसभा निवडणुकीत त्या राज्यात ७४ जागा भाजप जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंगाल आणि ओरिसामध्येदेखील भाजपच सत्तेवर येणार असा दावादेखील त्यांनी केला. भाजपने केलेल्या लोकोपयोगी कामांचा त्यांनी आढावा घेतला. 

 

बारामतीत कमळ फुलणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागा लढत आहोत. यातील ४३ जागा जिंकू. यात बारामतीची एक जागा असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने ती जागा गेली. मात्र, यंदा बारामतीमध्ये भाजप उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल, असे फडणवीस म्हणाले. 

 

भाजपचा "प्लॅन बी': ८ जागा मित्रपक्षांना

 ७५ टक्के विद्यमान खासदारांना तिकीट उमेदवारांची एक यादी तयार करण्यात आली आहे. 
सध्या असलेल्या २३ खासदारांपैकी जवळ-जवळ ९५ टक्के खासदारांना पुन्हा तिकीट देण्यात येणार असून काही जागा आयारामांना तर काही जागा पक्षातील वरिष्ठ नेत्यांना तिकीट देऊन दिल्लीला पाठवण्याची योजना भाजपने आखली आहे. ८ खासदारांवर टांगती तलवार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता या नव्या यादीत या ८ पैकी ३ खासदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सूत्रांनुसार, रक्षा खडसे, रावसाहेब दानवे, पूनम महाजन, किरीट सोमय्या, डॉ. सुभाष भामरे, नितीन गडकरी, हंसराज अहिर इत्यादी खासदार पुन्हा मैदानात असतील. 

 

बातम्या आणखी आहेत...