आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडांशेजारी भाजपच्या महिला पदाधिकारी बसणार का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - भारतीय जनता पक्षात गुंड, माफिया, गुन्हेगारांसह महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना प्रवेश देण्यात अाला अाहे. त्यामुळे बलात्कारींच्या शेजारी भाजपच्या महिला पदाधिकारी बसतील का? असा प्रश्न अामदार अनिल गाेटे यांनी उपस्थित करत भाजपवर टीका केली. भाजप शासकीय यंत्रणेला हाताशी धरून लोकसंग्रामच्या अडचणी वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरातील एकवीरा देवी मंिदरात लाेकसंग्रामच्या

 

उमेदवारांच्या प्रचाराला अामदार अनिल गाेटे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. अामदार अनिल गोटे म्हणाले की, अन्य पक्षातील गुंडांना भाजपत प्रवेश देण्यात अालेला अाहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गाेपीनाथ मुंडे हे राजकारणातील गुन्हेगारीकरणाच्या विरोधात होते. मात्र, आत्ताचा भाजप त्यांच्या विचारसरणीचा नसून पक्षात गुंड, वाळू, राॅकेल, भूमाफियांसह अनेक गुन्हेगारांसह महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकारी आता महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या शेजारी बसतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अामदाराच्या पत्नीबद्दल अाक्षेपार्य पाेष्ट व्हायलर केली जाते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावरही अाराेपीवर कारवाई हाेत नाही. जेथे अामदारांची पत्नी सुरक्षित नाही. तेथे सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेबाबत काेण हमी घेणार अाहे. भाजपत सर्वच गुन्हेगार असतील तर महिलांची अब्रू काेण वाचवणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

भाजपने एेनवेळी पक्षाने धाेका दिल्याने सर्व प्रभागात स्वतंत्र उमेदवार उभे केले. मात्र, पक्षाने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अापल्याला अडचणीत अाणण्याचा प्रयत्न चालवला अाहे. काही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. शिट्टी हे चिन्ह सर्व उमेदवारांना दिले नाही. पण अशा प्रकारला घाबरणार नाही. प्रचारातून भाजपला त्यांची जागा दाखवू, असेही ते म्हणाले. या वेळी प्रभाग क्रमांक एक, चार,पाच, सहामधील उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. 

 

भाजपचे फलक हटवले 
आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी प्रचार रथ तयार केले होते. या रथांवर भाजपचे चिन्ह व इतर माहिती देण्यात आली हाेती. मात्र, भाजपने निवडणुकीचे नेतृत्व न सोपवल्याने आमदार अनिल गोटे यांनी लाेकसंग्रामच्या माध्यमातून सर्व प्रभागात स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यानंतर त्यांनी आता सर्व प्रचार रथांवरील भाजपचे पोस्टर हटवले आहे. तसेच प्रत्येक प्रचार वाहनावर लाेकसंग्रामच्या उमेदवारांचे छायाचित्र, त्यांचे चिन्ह लावण्यात आले आहे. 

 

नातवांसह सहभाग 
प्रचार मोहिमेला प्रारंभ करण्यासाठी अामदार अनिल गाेटे दाेन्ही नातवांसह एकवीरा देवी मंिदरात अाले. त्यानंतर रॅली काढण्यात आली. या वेळी माजी नगराध्यक्षा हेमा गाेटे यांच्यासह अॅड. विशाल साळवे, दिलीप साळुंखे, निंबा मराठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...