आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसईत जमिनीच्या वादात भाजप नेत्याचा महिलेसह कुटुंबीयांवर हल्ला; तीन जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबईतील वसईच्या सातीवली भागात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने भर बाजारात एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना  बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. 


आरोपी आनंद सिंह वसईच्या भोईदा पाडात भाजपचा पदाधिकारी आहे. आनंद सिंहला आमच्या जमिनीवर कब्जा मिळवायचा आहे यामुळे त्याने आमच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले. महिलेच्या फिर्यादीवरून आनंद सिंह विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मारहाणीवेळी तेथील उपस्थित एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांना पुरावा म्हणून दिला आहे. सध्या आनंद सिंह फरार आहे.