आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा निकालानंतर पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये हिंसाचार, दोन भाजप कार्यकर्त्यांची हत्या; तर 150 लोक जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता/अगरतला - लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर बंगाल आणि त्रिपुरामध्ये सुरू झालेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही राज्यांतील अनेक शहरांमध्ये हिंसक घटना घडत आहेत. या दरम्यान दोन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या देखील करण्यात आली. दोन्ही राज्यांतील हिंसाचारात 150 लोक जखमी झाले आहेत. या हिंसेला तृणमूलचे समर्थक जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे ते म्हणाले. तर दूसरीकडे त्रिपुऱ्याचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर डाव्या पक्षाच्या लोकांनी हे हिंसाचाराचे आंदोलन सुरू केले आहे. पण कायदा हाती घेणाऱ्यांना क्षमा करण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले. 


बंगालमध्ये 25 वर्षीय भाजपा कार्यकर्त्याची हत्या 
पश्चिम बंगलाच्या नादिया जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री चकदाह परिसरात घडली. 25 वर्षीय संतु घोष याने काही दिवसांपूर्वीच तृणमूल सोडून भाजपात प्रवेश केला होता. भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या मते संतु रात्री 9 वाजेच्या सुमारास घरी परतला होता. काही वेळानंतर दोघांनी त्याला बाहेर बोलवले आणि त्याच्यावर गोळी झाडून फरार झाले. तर दूसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बैरकपूर मतदारसंघातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार घडला. एका स्फोटात एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले.


त्रिपुरात धारदार शस्त्रांनी भाजपा कार्यकर्त्यावर हल्ला
शुक्रवारी फटिकछेडा येथे विरोधी पक्ष सीपीएमचे समर्थक सदन देवनाथने आपल्या भावांसोबत मिळून भाजपा कार्यकर्ता मिथू आणि त्यांचा भाऊ संजीव या दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये मिथूचा मृत्यू झाला तर संजीवला अगरताल येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. 


तृणमूलला त्यांच्यात भाषेत उत्तर देणार - भाजपा प्रदेशाध्यक्ष
भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हिंसा पसरविण्याचा आरोप केला आहे. तृणमूलचे गुंड सतत विरोधी पक्षातील नेते आणि उमेदवारांवर हल्ले चढवत आहे. ममता बॅनर्जीच्या  तृणमूल पक्षाने मात्र हे आरोप फेटाळून लावले. फक्त धमकावण्यासाठी तृणमूल हिंसा करत असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांव हल्ले करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येणार असल्याचे दिलीप घोष यांनी सांगितले. 

 

त्रिपुरातील दोन जागांवर भाजप विजयी, तर भाजपची संख्या बंगालमध्ये 2 वरून 18 वर

भाजपाने यावेळी बंगलामध्ये 18 जागांवर विजय प्राप्त केला आहे. तर 2014 मध्ये भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी तृणमूलने 34 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र त्यांना 22 जागाच मिळाल्या आहेत. तर दूसरीकडे त्रिपुरात दोन्ही लोकसभा जागांवर भापने विजय मिळवला आहे. गेल्यावर्षी हा मतदारसंघ सीपीएमकडे गेला होता.