आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कार्यकर्त्याची पश्चिम बंगालमध्ये गोळी घालून हत्या; लोकसभा निवडणुकीपासून राजकीय हिंसाचार सुरूच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता - पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. रविवारी पहाटे भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाली. या हत्येमागे तृणमूलचा हात असल्याचा आराेप भाजपने केला आहे. खागपती महाताे असे कार्यकर्त्याचे नाव आहे. 


तृणमूलच्या गुंडांनी माझ्या मुलावर गाेळीबार केला. त्यात ताे गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बघुआ गावातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खागपतीवर हा हल्ला झाला, असे कार्यकर्त्याचे वडील रजनी महाताे यांनी सांगितले. हल्ला करणारे तृणमूल गटाचे हाेते. तेे सर्व मद्यधुंद अवस्थेत हाेते. 


पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कायर्कर्त्यांतील संघर्षाच्या घटना कमी झालेल्या नाहीत. दाेन्ही पक्षांनी परस्परांवर आराेप-प्रत्याराेप केले. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने भाजपविरोधी मोहिम उघडली असल्याचा आरोप केला जातो. ममतांनी उघडपणे अनेकदा केंद्र सरकारच्या विरोधात आघाडी करत असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी देशभरातील विविध राजकीय पक्षांनाही एकत्र आणले.