आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Workers Do Purification Of Former PM Lal Bahadur Shastri Idol After Priyanka Gandhi Paid Tribute

प्रियंका गांधी वढेरांनी घातला माजी पीएम शास्त्रींच्या पुतळ्याला हार, काही वेळातच येऊन धडकले भाजप कार्यकर्ते; गंगाजलने केले शुद्धीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा गंगा यात्रेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी काशी येथील रामनगर परिसरात पोहोचल्या. या ठिकाणी त्यांनी माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. प्रियंका तेथून गेल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचे अक्षरशः गंगाजलने शुद्धीकरण केले. भाजप कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रियंका यांचे पती रॉबर्ट वढेरा भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. अशात प्रियंकांनी शास्त्रींच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांचा अपमान केला.


दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल
तत्पूर्वी प्रियंका गांधी मिर्झापूरमार्गे निवडणुकीच्या प्रचारासाठी रामनगर येथे पोहचल्या. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. प्रियंका वढेरा दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी पीएम मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या. तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पळवून मारहाण केली. या दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती. याच दरम्यान प्रियंकांनी लाल बहादुर शास्त्री यांचे नातू दिवाकर शास्त्री यांची भेट घेतली. प्रियंका गांधी यांनी अस्सीघाट येथे स्थानिकांशी संवाद साधताना मोदींवर टीकास्त्र सोडले.

बातम्या आणखी आहेत...