आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तास्थापनेची तयारी भाजपचे चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार राज्यपालांना भेटणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालापासून गेले १४ दिवस राज्यात सुरू असलेले सत्तास्थापनेचे नाट्य संपुष्टात येण्याचे शुभसंकेत बुधवारी मिळाले. मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेेनेला बाजूला ठेवून २०१४ प्रमाणे एकटा भाजपच गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. विधिमंडळ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याएेवजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार हे दाेन ज्येष्ठ नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू शकतात. दुसरीकडे, मुख्यमंत्री आमचाच हाेईल, या भूमिकेवर ठाम असलेल्या शिवसेनेने गुरुवारी नूतन आमदारांची बैठक बाेलावली आहे. यात भाजपसाेबत जायचे की नाही, याबाबत निर्णय हाेऊ शकताे.


बुधवारी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुनगंटीवार म्हणाले की, 'जनतेने महायुतीलाच जनादेश दिला आहे. चंद्रकांत पाटील आणि मी गुरुवारी राज्यपालांना भेटायला जाणार आहाेत. राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल. महायुतीशिवाय कोणत्याही अन्य विषयावर आम्ही चर्चा केली नाही. चांदा ते बांदा महायुतीत निवडणूक लढवली आहे. अामचे प्रत्येक पाऊल हे महायुतीचं सरकार व्हावं यासाठीच पुढेच जातेय,' असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

गाेड बातमी कुणाची : भाजपची की शिवसेनेची?
'राज्यात फक्त महायुतीचेच सरकार येणार आहे, याविषयी कुणीही चिंता करू नये. तुम्हाला कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळू शकेल,' असे अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी पत्रकारांना सांगितले. राज्यपालांना भेटल्यानंतर महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय ते सांगितले जाईल. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड हाेईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, 'शिवसेनेचाच मुख्यमंत्री हाेईल, हीच गाेड बातमी कदाचित मुनगंटीवार देणार असतील,' असा टाेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

दिल्लीतही सुरु आहेत खलबते
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर 'मुख्यमंत्रिपदाबाबत काेणतीही तडजाेड नकाे,' असे माेदींनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.


भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तथा साेनिया गांधींचे विश्वासू अहमद पटेल यांनी भेट घेतली. ही भेट गुजरातच्या प्रश्नांवर असल्याचे अहमद सांगत असले तरी यात राजकीय चर्चा झाल्याचेही सांगितले जाते.

शिवसेना-भाजपनेच आता सरकार बनवावे : शरद पवार
जनतेने आम्हाला विराेधात बसण्याचा काैल दिला आहे, तेव्हा आम्ही विराेधी बाकावरच बसू. स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप- शिवसेनेनेच राज्यात सरकार बनवावे, असा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 'पवारांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करताे,' असे मुनगंटीवार म्हणाले.

दलवाई राऊतांच्या भेटीला
शिवसेनेला मदतीसाठी अनुकूल असलेले काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी शिवसेना खा. संजय राऊत यांची भेट घेतली. तर दुसरीकडे भाजप उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंची भेट घेऊन चर्चा केली.

विधानसभेची मुदत उरली दाेन दिवसांची
महाराष्ट्रातील १३ व्या विधानसभेची मुदत ९ नाेव्हेंबर राेजी संपत अाहे. ताेपर्यंत नवे सरकार अस्तित्वात येण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील दाेन दिवसांत राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी नागपुरात सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर युतीत समन्वयासाठी संघ नेत्यांनीही पुढाकार घेतल्याची माहिती अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी नागपुरात येणार असून तेही शिवसेनेशी चर्चा करू शकतात.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवा : काँग्रेस आमदारांची मागणी
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा, अशी एकमुखी मागणी बुधवारी रात्री मुंबईत काँग्रेस आमदारांनी केली. हा विषय दिल्लीत हाय कमांडला कळवण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, आम्ही आमदारांचा कल जाणून घेतला.
 

बातम्या आणखी आहेत...