आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन राज्यपालांची भेट घेणार चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सत्ता स्थापनेच्या दृष्टीकोणातून मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेसह शेतकऱ्यांचेही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच, बैठकीत भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांबाबतही चर्चा झाल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्राने महायुतीला जनादेश दिला आहे, उद्या चंद्रकांत पाटील आणि मी उद्या राज्यपालांना भेटणार आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून महायुतीचाच विचार करत आहे. महायुतीशिवाय कोणताही अन्य विषयाला शिवलं नाही. सरकार आमचचं येईल यात कसलीही शंका नाही. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे." 
"तुम्हाला कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल. त्यामुळे चिंता करू नका. सरकार फक्त महायुतीचे येणार आहे. कोणीही कितीही विचार केला, कोणी कितीही चिंता केली तरी सरकार महायुतीचे येईल. राज्यपालांना भेटल्यानंतर महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट करुत." असे मुनगंटीवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...