आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP's Notice To MP Ananth Hegdeen About Statement Of Gandhi; Order To Apologize

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'त्या' वक्तव्याबद्दल खासदार अनंत हेगडेंना भाजपची नोटीस; माफी मागण्याचे दिले आदेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांच्या उपवास आणि सत्याग्रहास ‘ड्रामा’ संबोधणारे भाजप खासदार अनंत हेगडे यांना पक्षाने चांगलेच फटकारत नोटीस जारी करून उत्तर देण्यास सांगितले आहे. सूत्रांनुसार पक्षाच्या उच्च नेतृत्वाने हेगडे यांना माफी मागण्याचेही निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, हेगडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच मोदींनी संसदेत अापली बाजू स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अनंत हेगडे यांनी शनिवारी बंगळुरूत म्हटले होते की, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात झालेले स्वातंत्र्य आंदोलन ड्रामा होते. संपूर्ण लढा इंग्रजांची सहमती आणि सहकार्याने देण्यात आला होता. या कथित नेत्यांपैकी कुणा एकालाही पोलिसांनी एकदाही मारहाण केली नाही.