आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०१४ मध्ये युती तुटताच वाढले भाजपचे संख्याबळ, अगोदर एकही नव्हता आमदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्णा तिडके

जालना - गतवेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना-भाजप युती तुटली. याचा सर्वाधिक फायदा भाजपला झाला. या निवडणुकीपूर्वी भाजपचा जिल्ह्यात एकही आमदार नव्हता. मात्र युती तुटल्यानंतर भाजपने स्वबळावर लढताना भोकरदन, बदनापूर आणि परतूर हे तीन मतदारसंघ ताब्यात घेत जिल्ह्यात आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले होते.

सध्या जिल्ह्यात भाजपचे ३ तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ आमदार आहे. जालना विधानसभा मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. भोकरदन विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली. त्यात भाजपचे संतोष दानवे यांनी राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला होता. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेश टाेपे यांनी भाजपचे विलासराव खरात यांचा पराभव करून घनसावंगीतून सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली होती.
परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसचे सुरेश जेथलिया यांचा पराभव केला होता. तर बदनापूर राखीव मतदारसंघात भाजपचे नारायण कुचे यांनी राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांचा पराभव करीत विधानसभा गाठली होती. अद्याप युतीचा निर्णय झाला नसल्याने शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे आघाडीकडून मात्र जागावाटपाचा जुनाच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय जवळपास निश्चित 
झाला आहे.

गत विधानसभा निवडणुकीतील स्थिती : जालना जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवार
जालना विधानसभा
४५,०७८  : अर्जुन खोतकर (शिवसेना) विजयी 
४४,७८२ : कैलास गोरंट्याल (काँग्रेस) पराभूत


बदनापूर : नारायण कुचे (भाजप) विजयी, बबलू चौधरी (राष्ट्रवादी) पराभूत
घनसावंगी : राजेश टोपे (राष्ट्रवादी) विजयी, विलासराव खरात, काँग्रेस, पराभूत
भोकरदन : संतोष दानवे (भाजप) विजयी, चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी) पराभूत
परतूर : बबनराव लोणीकर,भाजप, विजयी,  सुरेश जेथलिया,काँग्रेस, पराभूत

काँग्रेसच्या जागा घटल्या
जालना व  परतूर येथे काँग्रेसचे आमदार होते. गत निवडणुकीत या दोन्ही जागा काँग्रेसने गमावल्या. मात्र नगर पालिकांच्या जालना,परतूरसह भोकरदन पालिका काँग्रेसने ताब्यात घेतल्या. तर शिवसेनेची बदनापूरची जागा गेली. बदल्यात त्यांना जालन्याची जागा मिळाली.