आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप राबवणार 'सकाळी १०.३० वाजेपूर्वी मतदान' अभियान; समर्थकांच्या घरी जाऊन 'कमळ'च्या आकाराचे दिवेही पेटवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 'पराभवाचे विश्लेषण नाही, आता थेट लोकसभा निवडणुकीची तयारी.' भाजपच्या सर्वाेच्च नेतृत्वाने या मूलमंत्रासह २०१९ च्या निवडणुकांची तयारी केली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रापासून ते बूथ स्तरापर्यंत तीनस्तरीय अभियानाची रूपरेषा तयार केली आहे. पहिल्या स्तराचे अभियान आहे- माझे कुटुंब-भाजप कुटुंब, दुसरे- कमळज्योती संकल्प दीपक प्रज्वलन व तिसरे- १०.३० वाजेपूर्वी मतदान 

 

११-१२ जानेवारीला दिल्लीच्या रामलीला मैदानापासून पक्ष या अभियानाचा प्रारंभ करेल. पक्षाने येथूनच २०१४ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले हाेते. रणनीतीनुसार 'माझे कुटुंब-भाजप कुटुंब' अभियान राबवले जाईल. त्यात १२ फेब्रुवारीपासून २ मार्चपर्यंत राष्ट्रीय नेते-कार्यकर्त्यांपासून बूथ स्तरावरील कार्यकर्ते साेबतच आपापल्या घरांवर भाजपचा ध्वज व 'माझे कुटुंब-भाजप कुटुंब'चे स्टीकर लावतील. त्यानंतर बूथ स्तरावर घराेघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधतील. तसेच बूथ पातळीवर भाजप कार्यकर्ते व समर्थकांच्या घरी २६ फेब्रुवारीला 'कमळ' च्या आकाराचे दिवे प्रज्वलित करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. भाजपने पक्षाच्या विविध आघाड्यांना प्रत्येक राज्यात सक्रिय ठेवण्यासाठी १५ जानेवारीपासून १० फेब्रवारीदरम्यान शक्ती केंद्रप्रमुखांचे संमेलन आयाेजित केले आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात दोन क्लस्टर बनवण्यात आले असून, त्यांना स्वत: शहा हे मार्गदर्शनक करतील. ५ बूथचे एक शक्ती केंद्र बनवून त्यांची जबाबदारी मंडळस्तरीय कार्यकर्त्यांना दिली गेली आहे. त्यात शक्ती केंद्रप्रमुखांना ५ बूथवरील सदस्य व लाभार्थ्यांची यादी दिली जाईल, ज्यांच्याशी पुढील एका महिन्यात संपर्क साधावा लागेल. वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून पक्ष आणखी एक '१०.३० वाजेपूर्वी मतदान' नावाचे अभियान सुरू करत आहे; जेणेकरून नागरिकांचा मतदान केंद्रावर घेऊन जात पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण केले जाऊ शकेल. यादरम्यान प्रत्येक राज्यातील विद्यापीठांत युवा संसद होईल. 

 

भाजपच्या रणनीतीत हे महत्त्वाचे कार्यक्रमही 
- ११ फेब्रुवारीला पं.दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथी 'समर्पण दिन' म्हणून साजरी केली जाईल. 
- भाजपने निवडणूक प्रचार अभियानासाठी देशभरात सुमारे ८० प्रकाशन केंद्रे बनवली असून, तेथे पक्षाशी संबंधित साहित्य, प्रचारसामग्री उपलब्ध होईल. या केंद्रांत १४ ते २० जानेवारीदरम्यान राष्ट्रीय नेते पत्रकार परिषद घेतील. 
- पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे प्रसारण २७ जानेवारी व २४ फेब्रुवारीला होईल. ताे बूथ स्तरावर आवश्यक कार्यक्रम म्हणून आयोजित हाेईल. 
- पोस्टल मतदानाचा फायदा मिळवण्यासाठी पक्ष १५ जानेवारी ते ३ मार्चपर्यंत 'सैनिक सन्मान' अभियान राबवणार आहे. या राष्ट्रीय अभियानांशिवाय सातही आघाड्यांना सर्व समाजघटकांपर्यंत पाेहाेचण्यासाठी सक्रिय केले आहे. शेतकरी, महिला, अनुसूचित जाती-जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक व युवा आघाड्यांना राष्ट्रीय अधिवेशने घेण्याचे निर्देश या अगाेदरच दिले गेले हाेते. आता सर्वांना सविस्तर कार्यक्रम दिले असून, ते ८ मार्चपर्यंत पूर्ण करावयाचे आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...