आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या घोड्याची नाल करू शकते व्यक्तीचा भाग्योदय, शनी दोषातून मिळू शकते मुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी शनिदेवाचे महत्त्वही अधिक आहे. शनीला न्यायाधीश मानले गेले आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची स्थिती ठीक नसेल किंवा शनीमुळे भाग्य बाधा येत असतील तर येथे काळ्या घोड्याच्या नालचे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा. हे उपाय केल्यास शनीचा अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते.


1.काळ्या घोड्याच्या नालपासून एक खिळा किंवा छल्ला तयार करून घ्या. शनिवारी एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली एका लोखंडाच्या वाटीत मोहरीचे तेल भरून त्यामध्ये हा छल्ला किंवा खिळा टाका. तेलामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा आणि ही वाटी झाडाखाली ठेवून घर निघून यावे. या उपायाने शनीची साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव कमी होईल.


2. काळ्या घोड्याची नाल काळ्या कपड्यात बांधून घरातील धान्यामध्ये ठेवावी. यामुळे धान्यामध्ये बरकत कायम राहील.


3. नाल काळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास धन वृद्धी होते.


4. या नालपासून अंगठी तयार करून उजव्या हाताच्या मधल्या बोटात शनिवारी धारण करावी. या उपायाने शनिदेवाचा वाईट प्रभाव नष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...