आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजाभवानी मंदिरात होणारा पेड दर्शन पासचा काळाबाजार उघडकीस, पुजारी मंडळाने केली होती मंदिर संस्थानकडे तक्रार

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - तुळजाभवानी मंदिरात पेड दर्शन पासचा काळाबाजार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. एकच दर्शन पास अनेक वेळा वापरून हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अॅक्सिस कार्ड देणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह एका पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंदिर संस्थानने दिले आहेत. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकरणात तुळजाभवानी पुजारी मंडळाने तक्रार केली होती. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर मंदिर संस्थानचा अंकुश नसल्याने मंदिर संस्थानची बदनामी होत असल्याने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तुळजाभवानी मंदिरात गेल्या काही वर्षांपासून मंदिरात प्रवेशासाठी अॅक्सिस कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच वेळी मंदिर संस्थानने सशुल्क अर्थात पेड दर्शन सुविधा सुरू केली. 

 

प्रती व्यक्ती ३०० रुपयांत तत्काळ दर्शनाची सोय :


नवरात्र महोत्सवात प्रती व्यक्ती ३०० रुपये तर इतर कालावधीत १०० रुपये मोजून तत्काळ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र मंदिरातील कंत्राटी कर्मचारी यामध्ये भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मंदिर संस्थानने चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य आढळल्याने अॅक्सेस कार्ड कंपनीचा कर्मचारी व एका पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मंदिर संस्थानने दिल्याचे पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी सांगितले.स्कॅन न करताच पेड कार्डचा पुनर्वापर

अॅक्सेस कार्ड वितरण करणाऱ्या त्रिलोक कंपनीचे कर्मचारी अन्य कर्मचारी व काही पुजाऱ्यांशी संगनमत करून भाविकांनी काढलेले पेड दर्शन कार्ड स्कॅन न करताच पुन्हा-पुन्हा वापरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीतून उघडकीस आले. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा संशय असून हा प्रकार मंदिर संस्थान गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी केला आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अंकुश नाही

तुळजाभवानी मंदिरात कंत्राटी राज असून सुरक्षा, स्वच्छतेसह साडी, नारळ, पेंडखजूर, होमकुंड आदी कामासाठी शेकडो कंत्राटी कर्मचारी कामाला आहेत. मात्र, या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर मंदिर संस्थानचे लक्ष नसल्याने मंदिर संस्थानची बदनामी होत आहे. भाविकांशी हाणामारी करणे,भाविकांशी गैरवर्तन करणे यासह अभिषेक पास,पेड पासचा काळा बाजार करणे आदी प्रकार घडल्याने मंदिर संस्थानची बदनामी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...