आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुकेने व्याकुळ पिल्लाला आईने खायदा दिला सिगारेटचा तुकडा, इंटरनेटवर व्हायरल झाला फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरीका- येथील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर एक पक्षी आपल्या पिल्ल्ला सिगारेटचा तुकडा खाऊ घालत असताना फोटो कैद करण्यात आला. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या या फोटोला लार्गोची रहिवासी करेन मसूनने घेतले आणि आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केले. हा फोटो आता जगभरात व्हायरल झाला आहे. करेनने या फोटोला शेअर करत अपील केली आहे, बीचवर गेल्यावर त्याला साफ ठेवा आणि याला आपला सिगारेट अॅश-ट्रे समजू नका. 


लोकल रिपोर्ट्सनुसार या फोटोला एका आठवड्यांपूर्वी पायनलाज काउंटीच्या सेंट पीट्स बीचवर क्लिक करण्यात आले आहे. करेनने सांगितले, 'मी त्या पक्षाला पिल्लाला काहीतरी देत असताना पाहीले. तो मासा नाही, हे मला कळाले पण ते काय आहे हे कळत नव्हते? त्यानंतर मी फोटो काढला आणि घरी गेल्यावर कॉम्प्यूटरवर निट पाहिल्यावर तो सिगारेटचा तुकडा असल्याचे दिसले.

बातम्या आणखी आहेत...