आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर Ex Bf ठरला महिलेसाठी डोकेदुखी, म्हणाली-7 वर्षांच्या घृणास्पद प्रकारानंतर माझा बांध फुटला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालोद - छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्याच्या सुरेगाव परिसरात बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी महिलेचा प्रियकर असलेल्या आरोपीला अटक करून तुरुंगात रवानगी केली. आरोपी महिलेला लग्नानंतर ब्लॅकमेल करून वासनेची शिकार बनवत होता. 10 वर्षांपूर्वी आरोपी जिच्यावर प्रेम करायचा तिचे 2009 मध्ये दुसऱ्या मुलाशी लग्न झाले. त्यानंतर तिच्या प्रियकराच्या मनात वासना निर्माण झाली. त्यामुळे तो विवाहित प्रेयसीला ब्लॅकमेल करू लागला. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिने त्याच्याशी संबंध ठेवावे अशी त्याची इच्छा होती. तिने नकार दिला तर तो ब्लॅकमेलिंग करू लागला. बदनामीच्या भीतीने नाइलाजाने ती प्रियकराला भेटत राहिली. त्यानंतर 2011 ते 2018 म्हणजे 7 वर्षे तो तिला वासनेची शिकार बनवत राहिला. 


नातेवाईक असल्याचे कुटुंबीय महिलेवर ठेवत नव्हते विश्वास 
महिलेने कंटाळून पती आणि कुटुंबाला याबाबत सांगितले. पण तिच्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते. कारण आरोपी त्यांच्याच कुटुंबीयांचा नातेवाईक होता. त्यामुळे कुटुंबीय महिलेलाच खोटं ठरवू लागले. कोणीही ऐकूण घेईना म्हणून महिलेने पोलिसांत तक्रार केली. प्रकरणाच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीची रवानगी कोठडीत केली आहे. 


आरोपीही विवाहित 
नातेवाईक असल्याने आरोपी कधीही महिलेच्या सासरी येत जात होता. पती घरी नसेल तेव्हा तो तिच्यावर बलात्कार करायचा. महिलेला ब्लॅकमेल कर तो तिच्याबरोबस दुष्कर्म करायचा. महिला माहेरी गेल्यावरही तो तिच्या मागे लागायचा. रस्त्यानेही तो तिची छेड काढायचा. 


संयमाचा बांध फुटला 
महिला हा सर्व प्रकार सहन करत जवळपास 5 वर्षे सर्वकाही सहन करत होती. ती सर्वांपासून हे लपवत होती. कुटुंबाची मान खाली जाईल याची तिला भीती होती. लोकलाजेपोटी ती अनेक वर्ष या वेदना सहन करत राहिली. पण संयमाचा बांध फुटला आणि तिने पोलिसांत धाव घेतली. 


.. तर नातेच नसते जोडले 
30 वर्षीय महिला तिची आपबिती सांगत रडू लागली. ती म्हणू लागली की एक काळ असा होता जेव्हगा मी त्याला मनापासून प्रेम करत होते. पण तो माझ्यावर नव्हे तर माझ्या शरिरावर प्रेम करतो हे मला माहितीच नव्हते. हे माहिती असते तर मी त्याच्याशी नातेच जोडले नसते. त्याने मला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावर प्रेम केल्याचा मला पश्चात्ताप होत आहे, असे महिला म्हणाली. 

बातम्या आणखी आहेत...