आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blame Game In Discussion Over Rafale Jet Deal In Lok Sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल-मोदींनी \'एए\' चा फायदा करून दिला, जेटली-तुम्ही एका \'Q\'च्या मांडीवर खेळले आहात का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गोव्याचे मंत्री विश्वजित राणेंची ऑडिओ टेप जारी करत काँग्रेसने दावा केला की रफाल कराराच्या फायली माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांकडे आहेत. काँग्रेस प्रवक्ते म्हणाले, गोव्याचे मंत्री फोनवर म्हणतात.. रफालच्या फायली बेडरूममध्ये असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकरांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले आहे. संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, पर्रीकर या फायलींच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल करत आहेत. संसदेत ऑडिओ टेप वाजवण्याच्या राहुल यांच्या मागणीवर सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या, टेपच्या सत्यतेची हमी दिली तरच ते संभाषण वाचून ऐकवू शकतात. राहुल म्हणाले, पंतप्रधानांनी आपले प्रिय मित्र अनिल अंबानीवर ३० हजार कोटी रुपये उडवले. सभापतींनी नाव घेण्यास मज्जाव कल्यानंतर त्यांनी AA शब्द उच्चारून अंबानींचा उल्लेख केला. अरुण जेटलींनी Q च्या माध्यमातून बोफोर्स घोटाळ्यातील दलाल क्वात्रोचीचा उल्लेख करत म्हटले की, जेव्हा घोटाळा होत होता तेव्हा राहुल Qच्या कडेवर खेळत होते का? जेटलींनी चौकशीसाठी जेपीसीची मागणीही फेटाळली. 

 

संसदेबाहेर रफालवर टेप (यातील सत्यतेचा दिव्य मराठी दावा करत नाही.) 
ऑडिओतील महत्त्वाचा भाग.. 
रिपोर्टर : गुड इव्हनिंग सर! 
राणे : बॉस, गुड इव्हनिंग! मी काल कॉल केला होता. कॅबिनेट तीन तास चालली. 
रिपोर्टर : ओके 
राणे : ही गोष्ट कुणाला सांगू नका. 
रिपोर्टर : हो... हो 
राणे : बैठकीत मुख्यमंत्र्यांनी (पर्रीकर) एक मजेदार गोष्ट सांगितली की, त्यांच्या बेडरूममध्ये रफालच्या सर्व फायली आहेत. 
रिपोर्टर : (आश्चर्याने) काय सांगताय? 
राणे : बातमी केली पाहिजे. तुम्ही इतर मंत्र्यांकडून पडताळणी करू शकता. 
रिपोर्टर : ओके 
राणे : याचा अर्थ त्यांनी (पर्रीकर यांनी) या फायली काहीतरी मिळवण्यासाठी मुद्दाम दाबून ठेवल्या आहेत. 
काँग्रेसचा दावा खोटा : पर्रीकर, राणे 
पर्रीकर म्हणाले, अशी कोणतीच चर्चा मंत्रिमंडळ बैठकीत झाली नाही. मंत्री राणेंनीही टेपमधील आवाज आपला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले. 


Q म्हणजे क्वात्रोची जेटली उत्तरले : बोफोर्स घोटाळा कोणत्या सरकारमध्ये झाला होता. दलाल Q कोण होता? राहुल गांधी तेव्हा त्यांच्या कडेवर खेळत होते का? 

 

...आणि संसदेत चर्चेदरम्यान उडवले कागदी रफाल! 
काँग्रेस खासदारांनी संसदेत कागदी विमाने उडवली. यानंतर सभापती सुमित्रा महाजन यांनी १५ मिनिटे कामकाज तहकूब केले. गोंधळामुळे तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. 

 

राहुल VS जेटली 
राहुल: ५०० कोटींचे विमान १६०० कोटींत कुणाच्या सांगण्यावरून घेतले गेले
७० वर्षांपासून विमान निर्मिती करणाऱ्या एचएएलला मागे सारून AAच्या कंपनीला कंत्राट दिले. हे मोदींनीच केले.

जेटली : काही परिवारांना फक्त पैशांचेच गणित समजते, देशाची सुरक्षा कळत नाही 
ऑगस्टा प्रकरणात इटलीच्या महिलेचा मुलगा-R कोण आहे? ऑफसेट पार्टनर डॅसो कंपनीने निवडला, आम्ही नाही.  
 
वायुदलास १२६ विमाने हवी होती. मोदींनी सांगावे की, विमानांची संख्या घटवण्यास कुणी सांगितले होते? ते जेटली यांना समोर का करत आहेत? 

- पंतप्रधान म्हणतात की, विमानांची तत्काळ गरज होती. आमचा प्रश्न आहे की, मग आजवर एकही विमान भारतात का पाेहोचलेले नाही? 
- सभापतींनी राहुलना अनिल अंबानी यांचे नाव घेण्यास राेखले तेव्हा ते AA उच्चारले, प्रत्युत्तरात जेटलींनी Q वरून क्वात्रोचीचा उल्लेख केला 
- वायुदल कमकुवत होत होते. आपल्याला तत्काळ विमानांची गरज होती. काँग्रेस देशाच्या सुरक्षेशी खेळत आहे. आम्ही असे होऊ देणार नाही.
- यूपीए सरकार करार करत असताना म्हटले गेले की, विमान येण्यास ११ वर्षे लागतील. राहुल यांना मूलभूत माहिती नाही, याचे खूप आश्चर्य वाटते. 

 

'रफाल'वर ऑडिओ बॉम्ब 
AA म्हणजे अनिल अंबानी राहुल म्हणाले : पीएम म्हणतात, आरोप त्यांच्यावर नव्हे सरकारवर आहेत. मात्र त्यांनीच देशाचे ३० हजार कोटी रुपये त्यांचे प्रिय मित्र AA वर उधळले आहेत.