आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडोदराजवळ मेडिकल ऑक्सीजन सिलेंडर बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये भीषण विस्फोट, 6 जणांचा मृत्यू तर 10 जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हायड्रोजन-नायट्रोजन सिलेंडर फुटल्याने ब्लास्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

वडोदरा- गुजरातच्या वडोदराजवळ मेडिकल ऑक्सीजन सिलेंडर बनवणाऱ्या फॅक्टरीत भीषण विस्फोट झाला. यात 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. अपघात आज सकाळी झाला. हायड्रोजन-नायट्रोजनचे सिलेंडर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंडर बनवणारी कंपनी पादरा तालुक्यातील गवाशद गावाजवळ आहे. 'एम्स' असे कंपनीचे नाव आहे. या फॅक्टरीमधून हॉस्टील्सला ऑक्सीजन सिलेंडरचे सप्लाय होतो. ब्लॉस्टमुळे कंपनीच्या प्लांटचे छत उडाले. स्थानिक लोकांनी सांगितले की, ब्लास्टचे कंपन 3 किमी दूरपर्यंतही जाणवले.

बातम्या आणखी आहेत...