Home | National | Other State | Blast In Gas Tank In A Chemical Factory 6 dead Many Critically Injured Bijnor UP

पेट्रोकेमिकल फॅक्‍ट्रीत मिथेन गॅस टँकचा भीषण विस्फोट, 6 ठार, अनेक जण गंभीर जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 11:29 AM IST

उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये मिथेन गॅसच्या टँकचा विस्फोट झाला. 6 जण ठार झाले.

  • Blast In Gas Tank In A Chemical Factory 6 dead Many Critically Injured Bijnor UP

    बिजनौर (यूपी) - उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात एका केमिकल फॅक्ट्रीमध्ये मिथेन गॅसच्या टँकचा विस्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे 6 जण ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

    सूत्रांनुसार, बिजनौर जिल्ह्यात मोहित पेट्रोकेमिकल फॅक्ट्री आहे. येथे बुधवारी सकाळी अचानक मिथेन गॅसच्या टँकचा विस्फोट झाला. यानंतर पूर्ण कारखान्यात आग लागली. आग लागल्याने 6 कर्मचारी जळून ठार झाल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

    आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांच्यावर अजून उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, आगीने वेढलेल्या कारखान्यात अडकून बसलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Trending