आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वेटामधील मशिदीत जुमेच्या नमाजावेळी भीषण विस्फोट; पोलिस अधिकाऱ्यासह 16 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा जास्त जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विस्फोटात एका इमामाचीह मृत्यू झाला, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे

इस्लामाबाद- क्वेटाच्या घौसाबाद परिसरातील मशिदीत शुक्रवारी झालेल्या भीषण विस्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षाही जास्त लोक जखमी झाले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, विस्फोट संध्याकाळी नमाज पठनादरम्यान झाला. मृतांमध्ये क्वेटाचे डीएसपी अमानुल्लादेखील सामील आहेत. हा विस्फोट डीएसपींना निशाना बनवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मागच्या महिन्यातच क्वेटामध्ये डीएसपींच्या मुलाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. पण, अद्याप पुरावे नसल्याने दोन्ही प्रकरणांना जोडले गेले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि बलूचिस्तानचे मुख्यमंत्री जे. कमाल खान यांनी घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना चौकशीची रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. क्वेटामधील सर्व हॉस्पीटल्समध्ये इमरजंसी घोषित करण्यात आली आहे.बलूचिस्तानचे गृह मंत्री जिया लंगोवे यांनी घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अनेक लोक विस्फोटात जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींच्या इलाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण केला जाणार नाही. दहशतवाद्यांना पाकिस्तानातील विकास नकोसा झालाय. देशातील आणि बाहेरील शत्रू भय आणि अशांती पसरवण्याचे काम करत आहेत. पण, आम्ही त्यांची इच्छा कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत.