आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाँगकाँगच्या लाम्मा बेटाजवळ मालवाहू जहाजावर आगडोंब; स्फोटात 1 ठार, 3 जण बेपत्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग- व्हिएतनामला जाणाऱ्या तेलवाहू जहाजाने मंगळवारी अचानक पेट घेतला. अग्निज्वाळांचा भडका वाढल्याने प्रचंड स्फोट झाला. त्यात मालवाहू जहाजावरील एकाचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

ही घटना हाँगकाँगच्या दक्षिणेकडील लाम्मा बेटाच्या सागरी क्षेत्रात घडली. हाँगकाँग सरकारने तातडीने अग्निशमन दलाचे पथक सागरी क्षेत्रात रवाना केले. इंधन भरण्यासाठी हे जहाज विश्रांती घेत असताना जहाजावर हा आगडोंब उसळला. बचाव मोहीम सुरू असून खलाशांची नेमकी संख्या समजली नाही.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...