पाकिस्तानच्या क्वेटात हजारा समुदायावर हल्ला, 16 ठार तर 30 जखमी; इमरान खान यांनी केला हल्ल्याचा निषेध, चौकशीचे दिले आदेश

दिव्य मराठी

Apr 12,2019 02:54:00 PM IST


इस्लामाबाद - शुक्रवारी पाकिस्तानातील क्वेटात हजारा समुदायावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 16 लोक ठार तर 30 जण जखमी झाले. डीआयजी अब्दुल रझ्झाक चीमा यांनी या घटनेची माहिती दिली. मृतांची संख्या वाढणार असल्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे. जखमींना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची पोलिसांनी माहिती दिली.

हल्लेखोरांना माफी नाही

रेडिओ पाकिस्तानच्या मते, पंतप्रधान इमरान खान यांनी या घटनेचा निषेध केला असून याचा अहवाल मागवला आहे. तर या हल्ल्यामागील सुत्रधारांना माफ करणार नसल्याचे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जाम कमाल यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, शांती भंग करणाऱ्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल. तसेच कट्टरपंथी लोक समाजाला तोडण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

5 वर्षांत 509 ठार तर 627 जखमी

पाकिस्तानच्या नॅशनल कमीशन फॉ ह्युमन राइट्सच्या मते, जानेवारी 2012 ते डिसेंबर 2017 दरम्यान क्वेटात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हजारा समुदायाचे 509 लोक ठार तर 627 जण जखमी झालेत. एनसीएचआरने सांगितले की, क्वेटामध्ये लोकांवर हल्ले आणि हत्या होत आहेत. यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होत आहे.

X