आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारापूरच्या 'तारा नाईट्रेट' केमिकल कंपनीत भीषण स्फोट,आठ कामगार जागीच ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्फोटामुळे 15 ते 20 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला
  • संध्या. 7.20 वाजता हादऱ्यांमुळे कंपनीची इमारत कोसळली
  • मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर

मुंबई - बोईसरजवळ तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका रासायनिक कारखान्यात शनिवारी सायंकाळी भीषण स्फोटात कंपनी मालकासह 8 कामगार जागीच ठार झाले. ढिगाऱ्यांखाली दबलेल्या काही कामगारांना वाचवण्यात आले असून काहींचा शोध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. बांधकाम सुरू असलेल्या अंक फार्मा कंपनीच्या इमारतीत काही रसायनांची चाचणी घेतली जात असताना संध्याकाळी 7.20 वाजता हा स्फोट झाला. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून जखमी व मृतांचा शोध सुरू आहे. कंपनीत अमोनियम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात असल्याचे सांगितले जाते. 
 

डहाणू, पालघरपर्यंत हादरे

स्फोटामुळे 15 ते 20 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. डहाणू व पालघरपर्यंतच्या गावांमध्ये तो ऐकू आला. अनेकांना तर  भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला.