आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग - चीनच्या एका रासायनिक कारखान्यात बुधवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात किमान 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. स्थानिक प्रशासनाने सोशल मीडियावर जारी केलेल्या माहितीनुसार, हा स्फोट राजधानी बीजिंगपासून 200 किमी दूर झांगजियाकोऊ येथील हीबेई शेंग्वा नावाच्या केमिकल कंपनीत झाला. स्फोट इतका भयंकर होता की कारखान्यातील 50 ट्रक जळून खाक झाले. सोबतच त्या ट्रकचे तुकडे हवेत उडून आसपासच्या रस्ते आणि परिसरात जाऊन पडले. या स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
#Update: 22 killed, 22 others wounded in the explosion at a chemical factory in Zhangjiakou, North China’s Hebei Province; injured hospitalized, probe underway. (Video: We Video) pic.twitter.com/ZmqKWKkvzA
— Global Times (@globaltimesnews) November 28, 2018
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.