आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लास्टिंगने शाळा हादरली, जीवित हानी टळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरुंगाच्या स्फोटामुळे शळेच्या पत्र्यांना व भिंतीना तडे गेले असून छताचा काही भाग कोसळला आहे. - Divya Marathi
सुरुंगाच्या स्फोटामुळे शळेच्या पत्र्यांना व भिंतीना तडे गेले असून छताचा काही भाग कोसळला आहे.

कन्नड : कन्नड पासून जवळच असलेल्या अंधानेर केंद्रातील जयभवानीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीला ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे शाळेला हादरे बसले आहे.


याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात सोलापूर-धुळे महामार्गाचे चालू असलेल्या कामामुळे दि.२१ ऑक्टोबर रोजी रोड लगत घेतलेल्या सुरुंगामुळे परिसरातील काही घरांचे तसेच जिप शाळा जयभवानी नगर या प्राथमिक शाळेच्या इमारतीस तडे गेलेले असून एका खोलीचा छताचा भाग कोसळला आहे. तर दुसऱ्या भागाचे छत ही झुकल्याचे दिसत आहे. तसेच किचन शेडच्या पत्रावर मोठा दगड उडून पडल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. सदर इमारत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झालेली आहे असे शाळेच्या मुख्याध्यापकाने पत्राद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिप औरंगाबाद, शिक्षण अधिकारी प्रा औरंगाबाद, उपविभागीय अधिकारी कन्नड, तहसीलदार कन्नड, गटविकास अधिकारी पंस कन्नड यांना दिले आहे. आता दि. १३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होत असल्याने या शाळेतील येणाऱ्या विद्यार्थ्यांची महसूल प्रशासन, शिक्षण विभाग काय निर्णय घेतात याकडे नागरिक, पालकांचे लक्ष लागून आहे. 

बातम्या आणखी आहेत...