आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् अंधाच्या लग्नात डोळ्यावर पट्टी बांधून आले पाहुणे! ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - आॅस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे ३२ वर्षीय वधू स्टेफ अॅग्न्यूच्या लग्नात पाहुण्यांनी तिला धीर देण्यासाठी डोळ्याला पट्टी बांधून समारंभात सहभाग घेतला. अशा पद्धतीने येण्यासाठी स्टेफ अॅग्न्यू हिने पाहुण्यांना आवाहन केले होते. स्टेफला लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही आपणास होत असलेल्या अडचणींची जाणीव व्हावी म्हणून तिने असे आवाहन केले होते. लग्नात तिला पाठिंबा म्हणून लोकांनी डोळ्याला काळी पट्टी बांधली. अंगठी घालतानाही सर्वांनी शांतता बाळगली. त्यांनी आपले मोबाइल फाेनसुद्धा सायलेंट ठेवले होते. स्टेफने तिचा शेजारी रॉब कॅम्पाबेल याच्याशी नुकतेच लग्न केले. रॉब म्हणाला, स्टेफने तिला कधी पाहिले नाही. 

बातम्या आणखी आहेत...