आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Blind Mystic Baba Vanga's Scary Predictions For 2019 From Tsunami To Planned Assasination Of A Prime Minister

9/11 ची अचूक भविष्यवाणी करणा-या बाबा वेन्गाने 2019 साठी सांगितल्या होत्या या गोष्टी, सत्य झाल्या तर सर्व होईल उद्ध्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात भयानक त्सुनामी यासोबतच एका राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न होणार असल्याचा दावा 
बुल्गारिया. दक्षिण-पूर्व यूरोपातील देश बुल्गारियामध्ये एक अशा भविष्यकार होत्या, ज्यांना इतिहासातील दूसरे नास्त्रेदमस मानले जाते. 9/11 च्या हल्ल्यापासून तर त्सुनामीपर्यंतची अचूक भविष्यवाणी करणा-या बाबा वेन्गाच्या जास्तीत जास्त भविष्यवाण्या सत्यात उतरत आहेत. जर त्यांनी 2019 साठीची केलेली भविष्यवाणी अचूक ठरली तर, जग उद्ध्वस्त होऊ शकते. 

 

मृत्यूपुर्वी केल्या या भविष्यवाणी 
- 11 ऑगस्ट 1996 मध्ये बाबा वेन्गा यांचा मृत्यू झाला होता. यापुर्वीच त्यांनी हजारोवर्षांनंतर काय होणार याचे भविष्य पाहिले होते. त्यांच्या एका भविष्यवाणीनुसार 2019 मध्ये रुसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला होईल आणि अमेरिकेतील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना दुर्धर आजाराचा धोका आहे. म्हणजेच दोन्ही राष्ट्रपतींचा जीव धोक्यात पडू शकतो. 

 

एशियामध्ये पुन्हा येणार त्सुनामी 
- वेन्गा यांच्या अजून एका भविष्यवाणीनुसार 2019 मध्ये 2004 प्रमाणे त्सुनामी येईल. यामध्ये पाकिस्तान, भारत, इंडोनिशिया आणि जापानसोबतच अनेक देशांचा विनाश होईल. एका इंग्रजी वृत्तपत्राने कायदेशीररित्या वेन्गा यांच्या भविष्यवाण्या प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये लिहिले आहे की, 2019 मध्ये नैसर्गिक संकट सर्व जगासाठी घातक ठरतील. 

 

डोळे गेले पण लोकांना रस्ता दाखवला 
बुल्गारियामध्ये वेन्गा यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. वयाच्या 12 व्या वर्षी रहस्यमयी वादळामध्ये त्या हरवल्या होत्या. अनेक दिवसांनंतर त्यांची कुटूंबाशी भेट झाली. पण त्यांच्या डोळ्यांमध्ये खुप माती गेलेली होती. यामुळे त्यांची दृष्टी गेली. पण तरीही त्या खुप काही पाहायच्या आणि भविष्यवाणी करुन लोकांच्या मदत करायच्या. 

 

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याची भविष्यवाणी 
रुस आणि यूरोपमध्ये दिर्घकाळ त्यांना एक संत म्हणून सन्मानित करण्यात आले. 1996 मध्ये वयाच्या 85 वर्षी त्यांचा मृत्यू झाला. वेन्गा यांनी 50 वर्षात 100 भविष्यवाण्या केल्या. यामधील जास्तीत जास्त अचूक ठरल्या आहेत. यांच्या अनेक भविष्यवाण्या या वातावरण आणि नैसर्गिक आपत्तीसंदर्भात होत्या. जर 2019 ला केलेली भविष्यवाणी अचूक ठरली तर हे वर्ष खुप त्रासदायक ठरु शकते. 

 

सन 5079 मध्ये होणार जगाचा अंत 
- बाबा वेन्गाच्या पुस्तकामध्ये हजारोवर्षांच्या पुढच्या भविष्यवाणी आहेत. 2018 मध्ये मानवाव्दारे शुक्र ग्रहावर ऊर्जा स्त्रोताचा शोध, 2046 मध्ये मनुष्याव्दारे प्रत्येक अंगाची निर्मिती करणे शिकणे, 2066 मध्ये मुस्लिम तीर्थस्थळावर हल्ल्यानंतर भयानक हत्यारांचा वापर, 3005 मध्ये मंगळ ग्रहावर युध्दापासून 5079 मध्ये धरतीच्या अंतापर्यंत अनेक भविष्यवाण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...