Murder / सख्खा भाऊ झाला वैरी; क्षुल्लक कारणावरून भावाच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करत केला खून

जुळ्या भावांपैकी एकास गावाकडे नेऊन ठेवल्याने आला होता राग 

प्रतिनिधी

Sep 06,2019 01:01:25 PM IST

महागाव - सख्या भावानेच भावाच्या डोक्यावर लोखंडी पाईपचा वार करून त्याचा निर्घृण खून केला. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिल्ली (इजारा) येथे काल बुधवार (५ सप्टेंबर) रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोपाल पांडुरंग राठोड (२२ ) असे मृतकाचे नाव आहे. मारेकरी अर्जुन पांडुरंग राठोड (१८) हा घटनेनंतर फरार झाला आहे.


प्राप्त माहितीनुसार पांडुरंग राठोड यांना तीन अपत्य असून करण राठोड आणि अर्जुन राठोड हे दोघे जुळे भाऊ तर मृतक गोपाल हा थोरला भाऊ होता. करण-अर्जुन यांना नृत्य आणि अभिनयाचीही आवड असून हा छंद जोपासण्यासाठी ते दोघे काही दिवसापूर्वी पुणे येथे गेले होते. मात्र संधी न मिळाल्याने ते चिल्ली येथे परत आले. दोघेही एकत्र राहून कुठलेच काम करीत नसल्यामुळे थोरला भाऊ गोपाल याने जुळ्या भावांपैकी करण यास किनवट येथे नेऊन ठेवले. या कारणावरून गोपाल आणि अर्जुन या दोघांमध्ये काल रात्री जोरदार वाद झाला. रागाच्या भरात अर्जुन याने गोपालच्या डोक्यात लोखंडी पाईप मारला. यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी अर्जुन राठोड घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस पाटील राजू पाटील यांनी या घटनेची माहिती महागाव पोलिसांना दिली. आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी विकास तोटावार आणि ठाणेदार डी.के.राठोड पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. आरोपी अर्जुन राठोड हा नजीकच्या जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन पोलिस त्याचा तपास करीत आहेत.

X
COMMENT