आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून दैनिक भास्कर समूह आपले माजी चेअरमन स्व. श्री. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ७४ व्या जन्मदिनी (प्रेरणा दिवस) शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबरला देशभरात १८४ ठिकाणी गरजूंसाठी एकदिवसीय रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहे. विविध शहरांत ही शिबिरे होतील. त्यातील रक्त गरजूंना मदत व्हावी म्हणून शासकीय ब्लड बँकांना डोनेट केले जाणार आहे.
रक्तदानाचे महत्त्व : ४५ किलोपेक्षा जास्त वजन व १८ ते ६५ वयोगटातील मानसिक व शारीरिक तंदुरुस्त व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदानामुळे नव्या रक्तपेशी वेगाने तयार होतात व चेहराही उजळतो. आपल्या छोट्या प्रयत्नातून एखाद्या गरजूचा जीवही वाचू शकतो. हे समाधान जीवनात आनंद देते. हे रक्त अपघातग्रस्त, थॅलेसेमिया, गर्भवती महिला व गंभीर आजाराने पीडित रुग्णांचे जीव वाचवू शकते. म्हणूनच या सेवाकार्यात पुढाकार घेऊन सहभागी व्हा.
> जालना शहरात हे शिबिर शासकीय रुग्णालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजित होईल. त्यासाठी समन्वयक कृष्णा तिडके, मो. ९८८१७२७४२२ यांच्याशी संपर्क साधावा.
> बीड शहरात हे शिबिर शासकीय रुग्णालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजित होईल. त्यासाठी समन्वयक दिनेश लिंबेकर, मो. ९७६३७१७८२९ यांच्याशी संपर्क साधावा.
> औरंगाबाद शहरात हे शिबिर माहेश्वरी युवा मंचाच्या सहकार्याने श्रेयनगरमध्ये सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजित केले जाईल. त्यासाठी समन्वयक रूपेश कलंत्री, मोबाइल ९०४९०६७८८८ यांच्याशी संपर्क साधावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.