आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेशजींच्या स्मरणार्थ देशभर 191 ठिकाणी आज रक्तदान शिबिरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाच्या वतीने समूहाचे चेअरमन स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या ७४ व्या जन्मदिनी (प्रेरणा दिवस) शुक्रवार, ३० नोव्हेंबर राेजी देशभरात १९१ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले अाहे. विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरांत रक्तदात्यांनी दिलेले रक्त त्या-त्या शहरांतील शासकीय ब्लड बँकेला डोनेट केले जाईल. 


औरंगाबादेत शुक्रवारी ३० नोव्हेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनच्या वतीने व महेश यूथ क्लब तसेच आयसीएम इंजिनिअरिंग, एमबीए कॉलेज वाळूज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.  इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधून रक्तदान शिबिरात सहभाग घ्यावा.


> स्थळ  

- महेश यूथ क्लब, टी. के. व्हेंचर्स, बुलडाणा अर्बनशेजारी, पाटबंधारे ऑफिससमोर, जालना रोड, औरंगाबाद. 

- आयसीएम इंजिनिअरिंग, एमबीए कॉलेज, वाळूज एमआयडीसी, औरंगाबाद.
- दैनिक दिव्य मराठी कार्यालय, औरंगाबाद.


रक्तदान आरोग्यासाठी फायद्याचे  शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि १८ ते ६५ वर्षे वयोगटातील ४५ किलोपेक्षा अधिक वजन असलेली प्रत्येक व्यक्ती रक्तदान करू शकते. रक्तदानामुळे शरीरातील रक्तपेशी झपाट्याने वाढतात. वास्तविक रक्तातील लाल पेशींचे आयुष्य ९० दिवसांचे असते. या लाल रक्तपेशींच्या निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असते. त्यामुळे या पेशींची शरीरात कमतरता नसते. वर्षभरात तीन ते चार वेळा रक्तदान केल्याने शरीरातील लाल रक्तपेशींवर काहीही परिणाम होत नाही. वर्षात तीन-चार वेळा रक्तदान केल्याने रक्त घट्ट होत नाही. यामुळे हृदयविकार आणि कोलेस्टेरॉलसारख्या समस्यांत लाभ होतो. म्हणूनच तुमच्या या छोट्या प्रयत्नांतून गरजूंचा जीव वाचू शकतो. तुम्ही दान केलेल्या रक्तामुळे अपघातग्रस्त व्यक्ती, गर्भवती महिला, थॅलेसेमिया आणि गंभीर आजारी लोकांचे जीव वाचण्यात मदत होईल. 


रक्तदान शिबिरासंबंधी माहितीसाठी समन्वयक रूपेश कलंत्री (९०४९०६७८८८) यांच्याशी संपर्क साधावा. 

बातम्या आणखी आहेत...