पृथ्वीच्या 42 हजार / पृथ्वीच्या 42 हजार किमी जवळ आल्याने चंद्र दिसला माेठा

'ब्लड वुल्फ मून' : वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण; चंद्र 30 % अधिक तेजस्वी अन‌् 14 % माेठा, भारतात दिसले नाही; परंतु लाेकांनी पाहिले लाइव्ह स्ट्रीमिंग 

Jan 22,2019 11:25:00 AM IST

वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण साेमवारी झाले. ही खगाेलीय घटना युराेपसह अमेरिका, हिंद महासागर व मध्य अाशियातील देशांतील लाेकांनी पाहिली. भारतात मात्र हे चंद्रग्रहण दिसले नाही. तथापि, या घटनेबाबत प्रचंड उत्सुकता असल्याने नागरिकांनी त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिले. या चंद्राला 'सुपर ब्लड वुल्फ मून' असे नाव दिले गेले. हा चंद्र इतर पाैर्णिमांच्या तुलनेत १४ % माेठा व ३० % अधिक तेजस्वी हाेता. अशी घटना अडीच वर्षांत एकदा घडते. या प्रक्रियेस अमेरिकेची अंतराळ संशाेधन संस्था नासाने 'माेस्ट डॅझलिंग शाे' म्हणजे 'सर्वात चमकदार शाे' असे नाव दिले. या दिवशी चंद्र इतर दिवसांच्या तुलनेत पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे ३.६३ लाख किमीवर, तर इतर दिवशी पृथ्वीपासून ४.०५ लाख किमी दूर असताे.


पृथ्वीच्या वातावरणामुळे चंद्र दिसताे लाल
चंद्र केवळ पूर्ण चंद्रग्रहणावेळीच लाल दिसताे. त्याचा चंद्र बदलण्यामागे पृथ्वीवरील वातावरण असते. सूर्याचा प्रकाश चंद्रावरून परावर्तित हाेऊन पृथ्वीवर येताे व पृथ्वीवरील हवा व कणांवरून परावर्तित झाल्याने त्याचा रंग बदलताे किंवा त्याचा रंग मानवी डाेळ्यांसाठी बदलून जाताे. कारण पृथ्वीचे वातावरण अनेक रंगांना शाेषून घेते.


- हे ग्रहण सकाळी 10.13 वाजता सुरू हाेऊन 11.13 वाजता उच्च स्थितीवर गेले. त्यानंतर ते सुटण्यास सुरुवात झाली. ते 3 तास 17 मिनिटे चालले.


आता 16 जुलैला अंशत: चंद्रग्रहण
आता 16 जुलैला अंशत: चंद्रग्रहण हाेणार अाहे, तर पूर्ण चंद्रग्रहण 21 मे 2021 मध्ये दिसेल.
ब्लड मूनला अमेरिकेतील अनेक जातींनी 'ब्लड वुल्फ मून' म्हटले आहे. पाैर्णिमेच्या रात्री निघणारे काेल्हे हा चंद्र पाहून जाेरजाेराने अाेरडत असत.

X