आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bloomberg Index, Bill Gates Net Worth | Microsoft Co Founder Bill Gates, Bill Gates World's Richest After 2 Years, Net Worth Rs 7.89 Lakh

बिल गेट्स 2 वर्षांनंतर पुन्हा जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती, जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटस्फोमुळे इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्तीची घसरण
  • अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांची नेटवर्थ 7.82 लाख कोटी
  • बिल गेट्स यांची सध्याची नेटवर्थ 7.89 लाख कोटी

वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स (64) दोन वर्षांनंतर पुन्हा जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये बिल गेट्स यांनी पिछाडीवर टाकून अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस नंबर वन ठरले होते. आता बेझोस (55) दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. बिल गेट्स यांची नेटवर्थ आता 110 अब्ज अमेरिकन डॉलर ( 7.89 लाख कोटी रुपये) आहे. तर जेफ बेझोस यांची सध्याची संपत्ती 109 अब्ज अमेरिकन डॉलर (7.82 लाख कोटी रुपये) आहे.

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार जगातील टॉप 5 धनकुबेर

नाव / कंपनी / देशनेटवर्थ (डॉलर)नेटवर्थ (रुपये)
बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट (यूएस)110 अब्ज7.89 लाख कोटी
जेफ बेजोस, अॅमेझॉन (यूएस)109 अब्ज7.82 लाख कोटी
बर्नार्ड अरनॉल्ट, एलव्हीएमएच (फ्रान्स)103 अब्ज7.39 लाख कोटी
वॉरेन बफे, बर्कशायर हॅथवे (यूएस)86.6 अब्ज6.21 लाख कोटी
मार्क झकरबर्ग, फेसबूक (यूएस)74.5 अब्ज5.34 लाख कोटी

घटस्फोट घेतला नसता तर नंबर एकला असते बेझोस

  • मायक्रोसॉफ्टचे शेअर गेल्या काही दिवसांमध्ये वधारल्याचा फायदा गेट्स यांना झाला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 25 ऑक्टोबर रोजी मायक्रोसॉफ्टला 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या क्लाउड कंप्युटिंगचे कंत्राट देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच मायक्रोसॉफ्टच्या शेअरमध्ये 4% तेजी आली होती. या दरम्यान अॅमेझॉनचे शेअर 2% ने घसरले. मायक्रोसॉफ्टचे शेअर या वर्षी 48% पर्यंत वाढले आहे.
  • तर दुसरीकडे, जेफ बेझोस यांनी आपली पत्नी मॅकेन्झी हिला जानेवारी महिन्यात घटस्फोट दिला. एप्रिलमध्ये त्यांच्यात सेटलमेंट झाली त्याअंतर्गत बेझोस यांनी आपले 25 टक्के शेअर माजी पत्नीच्या नावे केले. मॅकेन्झीच्या या शेअर्सची सध्याची किंमत 35 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. हेच शेअर जेफ बेझोस यांच्याकडे असते तर आज बेझोस यांची एकूण संपत्ती 144 अब्ज असती आणि ते अजुनही जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले असते.
बातम्या आणखी आहेत...