आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Blow To Team India As Captain Virat Kohli Thumb Injured During Practice Session World Cup 2019

World Cup 2019: पहिल्या सामन्याच्या 3 दिवसांपूर्वीच भारताला झटका; सरावादरम्यान कोहलीच्या अंगठ्याला दुखापत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात होणार आहे. परंतु, या सामन्याच्या अवघ्या 3 दिवसांपूर्वी विराट कोहलीला दुखापत झाली. सराव सुरू असताना शनिवारी विराटच्या उजव्या हाताच्या त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. कोहलीपूर्वीच टीमचे आणखी दोन सदस्य विजय शंकर आणि केदार जाधव जखमी होते. या दोघांना फिट घोषित करण्यात आले तरीही ते खेळणार की नाही यावर अजुनही संभ्रम आहे. कारण, न्यूझीलंडच्या विरोधात झालेल्या सराव सामन्यात शंकर उतरला नाही. तर केदार जाधव दोन्ही वार्म-अप सामन्यांमध्ये सहभागी झाला नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी सराव सुरू असताना विराटच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे, वेळीच त्याच्यावर उपचार करण्यात आले. कित्येक मिनिटे तो टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फारहार्ट यांच्याशी बातचीत करताना आणि ट्रीटमेंट घेताना दिसून आला. फारहार्ट यांनी सुरुवातीला विराटच्या अंगठ्याला स्प्रे लावला. यानंतर बर्फाने शेक दिला. सराव संपल्यानंतरही विराटचे लक्ष अंगठ्यावरच होते. मैदानाबाहेर पडताना त्यांच्या हातात बर्फाचा ग्लास होता. त्यामध्ये त्याने आपला जखमी अंगठा धरला होता. विराटला ही दुखापत बॉलिंग करताना झाली की बॅटिंग करताना हे अद्याप स्पष्ट नाही. बीसीसीआयने सुद्धा अद्याप विराटच्या अंगठ्याच्या दुखापतीवर अधिकृत माहिती जारी केली नाही.