आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात महाग आहे या जीवाचे विष, एका लिटरची किंमत आहे 76 कोटी रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

76 कोटी रूपयांचे विष 

तुम्‍हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की, जगात असेही एक विष आहे, ज्‍याच्‍या केवळ एका लिटरची किंमत आहे तब्‍बल 76 कोटी रूपये. कोट्यधीश बनण्‍यासाठी तुम्‍ही याचा व्‍यवसाय करण्‍याचा विचार करत असाल तर हेदेखील फार सोपे नाही. कारण ज्‍या किटकापासून हे विष मिळवले जाते, तो आहे निळा विंचू. या विंचाच्‍या विषापासून विडसटॉक्‍स नावाचे औषध बनवले जाते. या औषधाने कँसर तसेच इतर दुर्लभ आजार मुळापासून बरे होण्‍यास मदत होते. क्‍युबामध्‍ये तर या विषाला चमत्‍कारी औषध मानले जाते. 

 

सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे व्हिडिओ 

तसे तर महागडे विष आणि त्‍यांच्‍यापासून बनविण्‍यात येणारी औषधं या काही नविन गोष्‍टी नाहित. मात्र हेशम अल-गलील नावाच्‍या फेसबुक पेजवर या विंचाच्‍या विषासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्‍ट करण्‍यात आला आहे. तो सध्‍या चांगलाच व्‍हायरल होत आहे. या पोस्‍टला आतापर्यंत 4 कोटीहून अधिक वेळा पाहण्‍यात आले आहे तर जवळपास 4 लाख 47 हजार लोकांनी याला शेअर केले आहे. या फेसबुकपेजचे जवळपास 2,91,45,579 फॉलोअर्स आहेत.

 

थायलंडच्‍या किंग क्रोबाच्‍या विषापेक्षाही महागडे 

या व्‍हायरल पोस्‍टमध्‍ये सांगण्‍यात आले आहे की, निळ्या विंचूच्‍या एका लिटर विषाची किंमत 75 कोटी 86 लाख 22 हजार 62 रूपये ऐवढी आहे. याचाच अर्थ थायलंडमधील जगप्रसिद्ध किंग कोब्राच्‍या विषापेक्षाही हे विष महाग आहे. किंग कोब्राच्‍या एका लिटर विषाची किंमत आहे 30 कोटी 24 लाख 540 रूपये. म्‍हटले जाते की, निळ्या विंचाच्‍या विषाने आणखीही काही असाध्‍य रोग बरे केले जाऊ शकतात. सध्‍या यावर संशोधन चालू आहे. जर खरेच असे झाले तर याची किंमत आणखी वाढू शकते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या विंचूचे फोटो...


  


 

 

बातम्या आणखी आहेत...