आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच सरकारनं हद्दच केली राव! 2 पुरुषांची दाखवली एकच पत्नी, पीडितेने मागितली नुकसान भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा सरकारच्या १५ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या दोन जाहिरातींमुळे एका महिलेचा घोर अपमान झाला. दोन विविध जाहिरातींमध्ये या महिलेचा पती म्हणून दोन भिन्न व्यक्ती दाखवल्या आहेत. 'सुखी कुटुंब' दाखवणारे छायाचित्र यात होते. तेलगू वृत्तपत्रातील जाहिरातींत ही महिला तिच्या पतीसोबत दिसते. मात्र, इंग्रजी वृत्तपत्रात दुसराच पुरुष तिचा पती दाखवला आहे. याप्रकरणी जनसंपर्क विभागाने जाहिरात संस्थेला नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. महिलेने प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  


महिलेने म्हटले की, एका छायाचित्रात तिचे पती आहेत. मात्र, दुसऱ्या छायाचित्रातील व्यक्तीला ती ओळखत नाही. ते संपादित केलेले आहे. विनापरवानगी सरकारने तिचे छायाचित्र वापरले आहे. शिवाय अनोळखी व्यक्तीला तिचा पती दाखवले. परिचित लोक आपली थट्टा करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. या दांपत्याचे नाव नायकुला नागराजू (३२) आणि पद्मा (२६) आहे. ते सूर्यापेट जिल्ह्यातील निवासी आहेत. 


जनसंपर्क आयुक्तांनी सांगितले की, याप्रकरणी चौकशी केली जाईल. 'रायतू भीम' आणि 'कांती वेलुगू' योजनांच्या जाहिरातीत या अपमानकारक चुका झाल्या आहेत. दोन जाहिरात संस्थांना प्रचार अभियानाचे काम दिले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...