आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजवणार नाही आणि नागरिकांनाही बुजवू देणार नाही, बीएमसीचा नवा फरमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पावसाळ्यात किंवहूना वर्षभर मुंबईत खड्यांचे साम्राज्य असते. नागरिकांना नागमोडी वळणं घेऊन गाडी चालवावी लागते. बऱ्याचदा खड्यांमुळे अनेकदा अपघातही होतात. या बीएमसीचे तर या खड्यांकडे दुर्लक्ष असेतच, किंवा खड्डे बुजवण्याच्या कामात कधी दिरंगाई होते. अशाच अनेकदा नागरीक पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवतात. अनेकजण आपल्यापरीने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतो. पण आता अशा नागरिकांना सावधान होण्याची गरज आहे, कारण बीएमसीने खड्डे बुजवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. 
 

    मुंबईच्या रस्त्यांची दरवर्षीच चाळण झालेली पाहायला मिळते. हे खड्डे बुजवण्यात बीएमसी दिरंगाई करते. अशात मुंबईकर स्वतः किंवा संस्थांच्या मदतीने हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करतात. पण आता स्वतःहून रस्त्यावरील खड्डे बुजवणे गुन्हा ठरणार आहे. पालिकेने केलेल्या एका ट्वीटने हे समोर आले आहे. बीएमसीच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यात लिहीले आहे की, "प्रिय मुंबईकरांनो, आता रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी @mybmc कडे जा, हाच कायदेशीर आणि योग्य मार्ग आहे. मोडतोड करुन स्वत: खड्डे भरण्याचे टाळा. खड्डे भरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपघात होऊ शकतात. असे करणे बेकायदेशीर आहे. कृपया कायदा हातात घेऊ नका." असे त्यात म्हटले आहे. या ट्वीटनंतर विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.   त्यामुळे आता पालिका प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत असो वा नसो, पण तुम्ही खड्डे बुजवण्याचे सामाज कार्य करू नका, असे केले तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.  

बातम्या आणखी आहेत...