आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डाचे विद्यालयांना ४ वेळा स्मरणपत्र, तरीही माहिती नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहावी-बारावी बोर्ड परीक्षा जवळ आल्या असून, प्रत्येक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विषय शिक्षकांची संख्या आणि उत्तरपत्रिका तपासणीसाठी असलेल्या शिक्षकांची संख्या आदी माहिती अपडेट करून बोर्डाला पाठवण्यात यावी, अशा सूचना विद्यालयांना देण्यात आल्या होत्या. आतापर्यंत चार वेळा स्मरणपत्रही पाठवण्यात आले. तरीदेखील विद्यालयांकडून माहिती पाठवण्यास उदासीनता दिसत असल्याने बोर्डाला सहकार्य करत नसाल तर तुमची बोर्ड संलग्नता का काढू नये, असे सूचनापत्र विद्यालयांना पाठवण्यात आले आहे. 


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०१९-२०२० शैक्षणिक वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी परीक्षक, नियामक आणि प्राश्निक यांची ज्येष्ठता यादी (पॅनल) बनवण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, दोन वेळा पत्र पाठवूनदेखील शिक्षकांच्या यादीसाठी शाळांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे, शाळांना पुन्हा यादी पाठवा म्हणून चौथ्यांदा स्मरणपत्र पाठवण्यात आल्याची माहिती मंडळाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. 


माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी औरंगाबाद विभागातील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांनी विषय शिक्षकांची यादी पाठवलेली नाही.

 
त्यांनी मंडळास त्वरित यादी सादर करावी, असे आवाहन सचिव सुगता पुन्ने यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. निर्धारित वेळेत कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळांचे फेब्रुवारी- मार्च परीक्षेचे आवेदन पत्रांचे साहित्य स्वीकारले जाणार नाही, असा इशाराही प्रसिद्धिपत्रकात देण्यात आला आहे. परीक्षा घेणे आणि वेळेत निकाल लावण्याची जबाबदारी जशी बोर्डाची आहे, तशीच वेळेत निकाल लावण्यासाठी सहकार्य करण्याची जबाबदारी उत्तरपत्रिका तपासण्याबरोबरच परीक्षेसाठी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्यांचीदेखील आहे, असे पुन्ने यांनी सांगितले. 


दोन लाख विद्यार्थी देणार परीक्षा 
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली असून दोन लाख विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षा देणार आहेत. विद्यार्थी संख्या वाढत असल्याने उत्तरपत्रिका तपासणीसाठीही अधिक शिक्षकांची गरज आहे. ज्या संस्था बोर्डाला सहकार्य करणार नाहीत, त्यांचे बोर्ड संलग्नीकरण का रद्द करू नये, असा सवाल बोर्डाने दिलेल्या सूचनापत्रात विद्यालयांना केला आहे. 


बोर्डाला सहकार्य करण्याचे आवाहन 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी औरंगाबाद विभागातील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांनी विषय शिक्षकांची यादी पाठवलेली नाही. त्यांनी मंडळास त्वरित यादी सादर करावी, असे आवाहन सचिव सुगता पुन्ने यांनी दोन महिन्यांपूर्वी केले होते. 

बातम्या आणखी आहेत...