आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोट अपघातातील मृतांची संख्या सातवर, दोन बालकांचे मृतदेह सापडले; शोधकार्य सुरुच, नंदूरबार जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार- धडगाव तालुक्यातील भूषा येथील बोट अपघातात बेपत्ता असलेल्या दोन बालकांचे मृतदेह बुधवारी सापडले. त्यामुळे मृतांचा आकडा सातवर पोहोचला आहे. बोट मालकाविरुद्ध धडगाव पोलिसांत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. 


मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी दुपारी पूजाविधीसाठी जाणाऱ्या आदिवासी भाविकांची बोट उलटून ५ जणांचा मृत्यू झाला होता, तर ४० भाविकांना वाचवण्यात यश आले होते. मात्र, दोन बालके बेपत्ता होती. त्यांचा मंगळवारी शोध सुरू होता. बुधवारी सकाळी दोन्ही बालकांचे मृतदेह आपत्ती निवारण पथकाच्या हाती लागले. सीमर भाईदास पावरा (४), मोनिका वीरसिंग पावरा (५, तेलखेडी) अशी दोघांची नावे आहेत. मृतदेहांवर तेलखेडी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेस जबाबदार असलेला बोट मालक वसंत भामट्या पावरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. बोटीचा पंचनामा करून बोट ताब्यात घेण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...