आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना : भोपळमध्ये गणेश विसर्जनावेळी बोट उलटली; 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तीन बेपत्ता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये गणेश विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घटली. येथील खटलापुरा घाटावर पहाटे साडेचार वाजता गणपती विसर्जनावेळी बोट पलटून 11 जणांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार या बोटीत 19 लोक होते. यातील पाच लोकांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आले तर तिघांचा तपास सुरुच आहे. घटनास्थळी एसडीआरएफ, पाणबुडे आणि पोलिस दल उपस्थित आहे. 

जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. या अपघातात 11 जणांचा मृत्यू दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच ही घटना कशी घडली याबाबत चौकशी करण्यात येईल असे ते म्हणाले. 

एका नाव उलटल्याने दुसऱ्या नावेवर लोकांनी घेतल्या उड्या 
प्रत्यक्षदर्शींच्या मते, दोन बोटी एकमेकांसोबत जोडलेल्या होत्या. यावर 27-28 वयोगटातील 22-23 लोक होते. यांपैकी एकानेही लाइफ जॅकेट परिधान केलेले नव्हते. एक बोट उलटल्यामुळे त्यातील लोकांनी दुसऱ्या नावेवर उड्या घेतल्या. यामुळे नावेचे संतुलन बिघडले. ज्याठिकाणी ही घटना घडली तेथे जवळच मध्य प्रदेश होमगार्ड राज्य राज्य आपत्ती बचाव कार्यसंघ (एसडीआरएफ) चे मुख्यालय आहे. 

बातम्या आणखी आहेत...