आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्यूनीशियामध्ये प्रवासी जहाजाची जलसमाधी, 80 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा- ट्यूनीशियाच्या समुद्री परिसरात बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेले जहाज पलटी झाल्याने 80 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजेंसी(यूएनएचसीआर)ने यातून बचावलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी ही माहिती दिली. यूएनएचसीआरनुसार, अपघातानंतर स्थानिक मच्छीमारांनी चार जणांना वाचवले. पण नंतर त्यांच्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

 

यूएनएचसीआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवाशांनी भरलेली अपघातग्रस्त जहाज भूमध्य समुद्र पार करून इटलीकडे जात होती. अपघातात वाचलेल्या तीन जणांपैकी दोघांना शेल्टर होममध्ये पाठवले आहे. त्याच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे, तर एकाचा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे.


प्रवासी कुटुंबासहित जीव धोक्यात घालत आहे
भूमध्यसमुद्रासाठी यूएनएचसीआरच्या विशेष राजदूत विन्सेंट कोचटेलने सांगितले की, येथे मोठ्या संख्येने लोक जहाजातून पलायन करत आहेत. ते आपल्या कुटुंबासहित जीव धोक्यात घालत आहेत. आपल्याला त्यांच्यासाठी योग्य त्या सुविधा पुरवायला हव्या.