आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bobby Darling's Counseling Is Continuously Going On, Hearing On Divorce Case Soon Started

सलग सुरु आहे बॉबी डार्लिंगचे काउंसिलिंग, लवकरच सुरु होईल घटस्फोटाच्या केसवर सुनावणी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : भोपाळच्या रमणिक शर्मासोबत लग्न केल्यानंतर बॉबी डार्लिंग म्हणजेच पाखी शर्माने आता वांद्रा फॅमिली कोरामंध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र अजूनही बॉबी आणि रमणीकचे काउंसिलिंग सुरु आहे. पण बॉबीने रमणिकला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

सुनावणीदरम्यान सांगणार आहे घटस्फोटाबद्दल... 
एंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये बॉबीने सांगितले, 'कारवाई अजून सुरु झालेली नाही आणि आज काउंसलिंग सेशन होते.' तिने सांगितले की, वास्तविक सुनावणी सुरु झाल्यानंतर घटस्फोटाबद्दल विस्ताराने सांगेल. बॉबीने हेदेखील सांगितले की, ती आता खूप जास्त शांत आहे.  

 

पोटगीमध्ये मागितले दोन कोटी... 
बॉबीने लग्न मोडण्यासाठी आणि पोटगीच्या स्वरूपात 2 कोटी रुपये आणि ओशिवारामध्ये फ्लॅट देण्याची मागणी केली आहे. मात्र तिच्या पतीने दावा केला आहे की, त्यांचे लग्न हिंदू मॅरेज एक्टनुसार योग्य नाहीये कारण कारण यानुसार लग्न तेव्हा वैध असते जेव्हा ते एक महिला आणि पुरुषाचे होते. 

 

जस्टिससाठी बनवले होते फेसबुक पेज... 
बॉबीने आपली केस लाइम लाइटमध्ये ठेवण्यासाठी फेसबुकवर जस्टिस फॉर बॉबी डार्लिंग नावाने एक फेसबुक पेज बनवले होते.   

 

टाळली जात आहे सुनावणी... 
बाॅबीच्या केसची सुनावणी सतत टाळली जात आहे. मागच्यावेळी ती 5 मार्चला बांद्रा फॅमिली कोर्ट, मुंबईमध्ये केली गेली होती. जेथे बॉबी डार्लिंग आपली वकील भावना जाधवसोबत उपस्थित होती पण रमणीकने मेडिकल सर्टिफिकेट देऊन सुनावणीला नकार दिला होता. 

बातम्या आणखी आहेत...