आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉबी देओलने सेलिब्रेट केला आई प्रकाश कौरचा वाढदिवस, फोटो केला शेअर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शुक्रवारी रिलीज झालेल्या 'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर 4.25 कोटींची कमाई केली. चित्रपटात धर्मेंद्र दोन्ही मुलं सनी आणि बॉबी देओलसोबत दिसत आहे. चित्रपट रिलीजच्या दिवशीच म्हणजेच 31 ऑगस्टला सनी आणि बॉबीची आई प्रकाश कौरचा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवशी बॉबी देओलने त्यांना विश करत त्यांना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोमध्ये बॉबीची आईसोबत चांगली बॉन्डिंग दिसतेय. फोटो शेअर करत बॉबीने कॅप्शन लिहिले की, 'My love my life my everything MAA I love you. Happy birthday MAA'.


लाइमलाइटपासून दूर राहतात प्रकाश कौर 
- धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आणि सनी-बॉबीच्या आई प्रकाश कौर लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. त्या आजपर्यंत कोणत्याही फिल्मी पार्टी किंवा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. 
- 1954 मध्ये धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे लग्न झाले होते. त्यावेळी धर्मेंद्र 19 वर्षांचे होते. धर्मेंद्र यांनी चित्रपटात एंट्री घेतली तेव्हा सनी देओलचा जन्म (1956) झालेला होता. धर्मेंद्र-प्रकाश कौर यांना चार मुलं आहेत. मुलगा सनी-बॉबी देओल आणि मुली अजिता-विजेता या आहेत.
- चित्रपटात काम करता करता धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले. दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी-टाइनमध्ये रंगल्या. 

 

प्रकाश यांना देणार होते घटस्फोट 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांना प्रकाश यांच्याकडून घटस्फोट घ्यायचा होता. परंतु प्रकाश कौर घटस्फोट देण्यास तयार नव्हत्या. यानंतर धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्विकारुन हेमा यांच्यासोबत लग्न केले. 
 


 

 

 

बातम्या आणखी आहेत...