आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bodies Of Lost Four Members Of The Family Were Found After Five Days After Canal

पत्नी, मुलगी आणि दोन मुलांची केली हत्या, नंतर मृतदेहाचे तुकडे करून तलावात फेकले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजनाला(पंजाब)- अजनालाच्या तेडा खुर्द गावात शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील बेपत्ता असलेल्या चार जणांचे मृतदेह पाच दिवसांनंतर तलावात मिळाले. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा आणल्यामुळे वडील हरवंत सिंगनेचे आपला भाच्चा कुलदीप सिंग आणि गावातील इतर दोघांसोबत मिळून कुटुंबीयांचा काटा काढला. हरवंत सिंगसहित त्याला मदत करणाऱ्या गावातील इथर दोघांना पोलिसांनी अटक केले आहे, तर भाच्चा कुलदीप सिंग सध्या फरार आहे. हरवंत एक खोटी गोष्ट तयार केली की, पत्नी दविंदर कौर(52), मुलगा लवरूप सिंग(21), ओमकार सिंग(24), मुलगी शरणजीत कौर(29) घरातून बेपत्ता आहेत. पोलिसांकडे दविंदरचा भाऊ तक्रार घेऊन गेला, तेव्हा हरवंत सिंग आणि भाच्चा कुलदीप सिंग फरार झाले होते. 
 

तलावात मृतदेह मिळाल्यानंतर झाला खुलासा
चार दिवसानंतर दविंदरचा मृतेद तलावात मिळाला, तिथेच पोत्यात भरलेला लहान मुलगा लवरूपचा मृतदेह मिळाला. इतर मृतदेहांना शोधण्यासाठी बीएसएफची मदत घ्यावी लागली. शुक्रवारी तलावात दुसरा मुलगा ओमकार सिंग आणि मुलगी शरनजीत कौरचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी सांगितले की, त्या सगळ्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेळ्या पोत्यात भरले होते. यावेळी दविंदरला ज्या विटेसोबत बांधून तलावात फेकले होते, त्या विटेला त्यांच्या घरातील विटांसोबत तपासले.