आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावर साडीच्या एका बाजूला गर्भवती महिला तर दुसऱ्या बाजूला लटकला होता बाळाचा मृतदेह; तीन दिवसांपासून होते बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुना (मध्य प्रदेश) - गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गर्भवती महिलेसह तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. महिलेने त्या मुलाला आपल्या साडीच्या एका बाजूने लटकवले आणि स्वतः दुसऱ्या बाजूला लटकून आत्महत्या केली असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात सांगितले जात आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. यानंतरच खरे कारण समोर येईल. मृतक महिलेचे आपल्या पती आणि सासरच्या लोकांसोबत संबंध चांगले नव्हते. नेहमीच होणाऱ्या भांडणांना ती कंटाळली होती असे सांगितले जात आहे. 


एकाच झाडाला लटकले होते दोघांचे मृतदेह
गुना जिल्ह्यातील म्याना परिसरात राहणारी 20 वर्षीय चिगरी आपला पती दिलीप बरेलासोबत राहत होते. तिला एक दीड वर्षांचा मुलगा देखील होता. परंतु, 7 ऑक्टोबर रोजी ती आपल्या बाळासह अचानक बेपत्ता झाली. समस्त कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. माहेरी सुद्धा चौकशी करण्यात आली. परंतु काहीच पत्ता लागला नाही. पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्या महिलेचा आणि तिच्या 1.5 वर्षीय बाळाचा मृतदेह अशा अवस्थेत सापडले. तिच्या गावापासून 4 किमी दूर दुसऱ्या एका गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर या महिलेची ओळख पटली आणि तिच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती देण्यात आली. ही महिला गर्भवती होती असे कुटुंबियांनी सांगितले आहे.


रागात बाळाला घेऊन निघाली होती महिला
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 7 ऑक्टोबर रोजी या महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाला होता. याच वादानंतर तिने रागात आपल्या बाळाला उचलले आणि घरातून निघून गेली. पतीला वाटले की ती माहेरी गेली असावी. परंतु, त्या ठिकाणी सुद्धा ती पोहोचली नव्हती. पोलिस तक्रार झाली, शोधाशोध सुरू झाली. तेव्हा 3 दिवसानंतर दोघांचे मृतदेह सापडले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...