आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांनी होते 'बॉडी पेन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरदुखी ही सर्वसामान्य समस्या आहे. अनेक जण शरीरदुखीने त्रस्त आहेत. आपल्या रोजच्या जीवनातील काही गोष्टींचाही शरीरावर परिणाम होतो. तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे अंग दुखते.

श्वासोच्छ‌्वासाची पद्धत
धकाधकीच्या जीवनात आपण योग्य श्वास कसा घ्यायचा हे विसरलोय. त्यामुळे रात्री पुरेसे तास झोप झाली तरी सकाळी उठल्यानंतर डोके दुखू लागते. त्यामुळे आपण योग्यप्रकारे श्वास घेतोय का हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण श्वास कसा घेतोय ते पाहा आणि त्यावेळी दीर्घ श्वास घेत असल्याची खात्री करा जेणेकरून शरीराला ऑक्सिजन मिळेल.

व्यायाम
घाईत वॉर्म करणे किंवा ते टाळणे यामुळे शरीराला हानी पोहोचू शकते. वॉर्ममुळे शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे स्नायू जास्त लवचिक होऊन व्यायामासाठी योग्य बनतात. मात्र चुकीच्या पद्धतीने वॉर्मअप केल्यास ते शरीराला तितकीच हानी पोहोचवतात. त्यामुळे शरीराला दुखापत होते, तसेच व्यायामाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे 10 मिनिटे व्यवस्थित वॉर्मअप करा.

हवामान
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधनानुसार तापमानाचा आरोग्यावर परिणाम होतो. अधिक तापमानामुळे डोकेदुखी होते. प्रत्येक 9 ºF तापमान वाढीमागे डोकेदुखी ७ टक्क्यांनी वाढते. तापमानासोबत हवामान बदलल्यास त्याचा अधिक त्रास होतो. हवामान आपल्या नियंत्रणात नाही. मात्र आपण हवामानासोबत बदलावे.

ताणतणाव
शरीरातील प्रत्येक समस्येचे सर्वसामान्य कारण म्हणजे ताणतणाव. जास्त कालावधीच्या ताणतणावामुळे डोकेदुखी, अंगदुखी होते. शरीरात थकवा जाणवतो. त्यासाठी नियमित व्यायाम करणे. व्यायामामुळे शरीर मजबूत तर बनतंच शिवाय तणावही कमी होतो. योगामुळेही तणावमुक्ती मिळू शकते.

ऑफिसमधील काम
भरपूर तास खुर्चीवर बसणे, सातत्याने कॉम्प्युटरच्या स्क्रिनकडे लक्ष, कान आणि खांद्यामध्ये फोन यामुळे शरीर दुखते. ड्रायव्हर आणि आयटी प्रोफेशनल्स खूप कालावधीसाठी एकाच जागी बसतात. त्यांना ही समस्या होते. त्यामुळे काही काळ चालावे. एकाच जागी बसून काम असेल, तर शक्य तेव्हा थोडा वेळ उभे राहणे आणि जागेवरच थोड्या फेऱ्या माराव्यात.

लॅपटॉप
लॅपटॉप तसा वजनाने हलका असतो. मात्र एखाद्या बॅगेत लॅपटॉप आणि त्याच्याशी संबंधित साधने घेऊन दिवसभर फिरल्याने शरीरावर ताण पडतो. त्यामुळे लॅपटॉपची बॅग घेऊन फिरताना ती दोन्ही खांद्यांवर आळीपाळीने घ्यावी. तसेच दोन्ही पायांवर शरीराचे वजन सारखे ठेवावे. जेणेकरून एका बाजूला भार पडणार नाही.

बातम्या आणखी आहेत...