आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद खोलीत गर्लफ्रेंडशी अमानूष वागणूक, 40 मिनिटे चाकूने करत राहिला वार; कित्‍येक दिवस कोमात होती तरूणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॅकॉम्‍ब - अमेरिकेत गर्लफ्रेंडला मारहाण करताना क्रूरतेच्‍या सर्व सीमा पार केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. तरूणी आपल्‍या बॉयफ्रेंडच्‍या घरात अर्धमेल्‍या अवस्‍थेत आढळून आली आहे. शेजा-यांना याबाबत कळताच त्‍यांनी तिला हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले. नंतर घरातील सीसीटीव्‍ही फुटेजमधून बॉयफ्रेंडची क्रूरता समोर आली. जवळपास 40 मिनिटे लाथाबुक्‍यांनी त्‍याने तिला मारहाण चाकूने तिच्‍यावर वार केले. विशेष बाब म्‍हणजे मृत्‍यूच्‍या जबड्यातून परत आल्‍यावर तरूणीने आपल्‍या बॉयफ्रेंडवरील सर्व गुन्‍हे मागे घ्‍यावेत, अशी विनंती न्‍यायालयाला केली आहे. 


अर्धमेल्‍या अवस्‍थेत सापडली गर्लफ्रेंड 
- मिशीगनमधील मॅकॉम्‍ब काऊंटी येथील ही घटना आहे. 35 वर्षीय बॉडीबिल्‍डर पॉल बशीने आपल्‍या घरात गर्लफ्रेंड क्रिस्‍टीना पेरीला अतिशय क्रूरतेने मारहाण केली. 
- मारहाणीनंतर शेजा-यांनी क्रिस्‍टीनाला ताबडतोब रूग्‍णालयात दाखल केले. तेथे ती अनेक दिवस कोमात होती. 
- पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सूरू केली तेव्‍हा त्‍यांना घरातील सीसीटीव्हीमध्‍ये हे दृश्‍य आढळले. 
- व्हिडिओत दिसत आहे की, क्रिस्‍टीना घराबाहेर पडणार तेवढ्यात पॉलने तिच्‍यावर हल्‍ला चढवला. प्रथम लाथाबुक्‍याने त्‍याने मारहाण केली नंतर घरातील सामान तिच्‍यावर फेकत तिला गंभीररीत्‍या जखमी करण्‍याचा प्रयत्‍न पॉलने केला. 


जखमा ऐवढ्या भयानक कि दाखवणेही अवघड 
- पोलिस तपास अधिकारी पाम मॅक्‍लीन यांनी सांगितले की, क्रिस्‍टीनाला झालेल्‍या जखमा एवढ्या भयानक आहेत की, त्‍या दाखवणेही अवघड आहे. 
- पाम यांनी सांगितले की, जवळपास 40 मिनिटे तो तिला लाथाबुक्‍यांनी व चाकूने मारहाण करत राहिला. 


गर्लफ्रेंडचे अपील 
- बॉयफ्रेंडमुळे मृत्‍यूच्‍या जबड्यात गेलेल्‍या क्रिस्‍टीनाने बरे होताच बॉयफ्रेंडला शिक्षा होऊ नये व तो तुरूगांत जाऊ नये म्‍हणून अपील केले आहे. रिकव्‍हरीनंतर ती जेव्‍हा न्‍यायालयात आली तेव्‍हा तिने बॉयफ्रेंडवरील सर्व चार्ज हटवण्‍यात यावे, अशी विनंती न्‍यायालयाला केले. 
- क्रिस्‍टीनाने जजला सांगितले की, 'जे काही घडले त्‍यात पॉलची काहीच चूक नाही. या सर्वाला मीच जबाबदार आहे.' तिचे हे ऐकून कोर्टही आश्‍चर्यचकित झाले. 


सीसीटीव्‍ही फुटेज महत्‍त्‍वाचा पुरावा 
- काऊंटी प्रॉझीक्‍यूटर एरिक स्मिथ यांनी म्‍हटले आहे की, घरगुती हिंसेच्‍या अधिकतर प्रकरणात काहीच पुरावा मिळत नाही. मात्र या प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळावी म्‍हणून पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. 
 

 

बातम्या आणखी आहेत...