Home | International | Other Country | bodybuilder died of cancer warned everyone to avoid what he did before death

Body Building करताना एका चुकीने झाला कर्करोग, मरण्यापूर्वी धिप्पाड शरीराचे झाले होते असे हाल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 12:19 PM IST

पिळदार शरीरयष्टीसाठी आपण किती मोठी चूक केली हे डीनला कळाले तेव्हा खूप उशीर झाला होता.

 • bodybuilder died of cancer warned everyone to avoid what he did before death

  लंडन - पिळदार शरीरयष्टीसाठी ब्रिटनच्या या बॉडीबिल्डरने एक अशी चूक केली की त्याचा मृत्यू झाला. मँचेस्टरचा बॉडी बिल्डर डीन वॅरम्बी आपल्या शरीराला शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज कठोर व्यायाम करत होता. याच व्यायामासोबत त्याला एनर्जी ड्रिंकची जणू सवय लागली होती. ही सवय काही दिवसांनंतर त्याच्यासाठी व्यसन बनली होती. व्यायाम करण्यापूर्वी अनेक जण प्रोटीन शेक किंवा एनर्जी ड्रिंक घेतात. सुरुवातीला डीनने तसेच केले. परंतु, काही दिवसांत त्या एनर्जी ड्रिंकचे प्रमाण वाढत गेले. तो आपल्या व्यस्त आयुष्यात दिवसभर एनर्जी ड्रिंक घेत होता. हे ड्रिंक त्याच्या दिनचर्येचा भाग झाले होते. मग चेक-अपमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या.


  बॉडी बिल्डर डीनचे आरोग्य अचानक बिघडण्यास सुरुवात झाली. त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. वैद्यकीय चाचण्या केल्या तेव्हा डीनला लीव्हर कॅन्सर असल्याची माहिती समोर आली. एकेकाळी धष्टपुष्ट दिसणारा डीन सलग 8 महिन्यांपासून एनर्जी ड्रिंक घेत होता. याच व्यसनाने त्याला लीव्हर कॅन्सर झाला आणि कॅन्सरने त्याचा जीव घेतला. मेडिकल रिपोर्ट्सनुसार, डीन प्रति दिन 10 हजार कॅलरीज घेत होता. जिममध्ये गेल्यानंतरही ही प्रक्रिया सुरूच होती. तो जिमिंग करत असताना एकाचवेळी अनेक प्रोटीन सॅन्डविच आणि 7 ते 8 बॉटल एनर्जी ड्रिंक घेत होता. या दरम्यान अचानक त्याचे आरोग्य बिघडले.


  मरण्यापूर्वी लोकांना केले सतर्क
  पिळदार शरीरयष्टीसाठी आपण किती मोठी चूक केली हे डीनला कळाले तेव्हा खूप उशीर झाला होता. उपचार सुरू असताना त्याने साखर पूर्णपणे बंद केली आणि नैसर्गिक औषधोपचार सुरू केला. तरीही तो मृत्यूला पराभूत करू शकला नाही. 2015 मध्ये त्याने कर्करोगाशी दोन हात करताना आपला जीव गमावला. डीनला कळून चुकले होते, की तो आता मरणार होता. त्यामुळे, त्याने मरण्यापूर्वी फेसबूकवर लोकांना आपली आपबिती सांगितली. वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करून एनर्जी ड्रिंक्स आणि सप्लिमेंट योग्य प्रमाणात आणि तज्ञांचा सल्ला घेऊनच उपयोगात आणाव्या असे आवाहन त्याने केले.

 • bodybuilder died of cancer warned everyone to avoid what he did before death
 • bodybuilder died of cancer warned everyone to avoid what he did before death

Trending